साकाेलीत टिप्परच्या साहाय्याने अवैध रेती विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:30 AM2021-01-17T04:30:51+5:302021-01-17T04:30:51+5:30

साकाेली तालुक्यासाठी अवैध रेती उत्खनन काही नवीन विषय नाही. मात्र या अवैध रेती उत्खनन प्रकरणात शासनाचे नुकसान हाेत असून ...

Illegal sale of sand with the help of tipper in Sakali | साकाेलीत टिप्परच्या साहाय्याने अवैध रेती विक्री

साकाेलीत टिप्परच्या साहाय्याने अवैध रेती विक्री

Next

साकाेली तालुक्यासाठी अवैध रेती उत्खनन काही नवीन विषय नाही. मात्र या अवैध रेती उत्खनन प्रकरणात शासनाचे नुकसान हाेत असून अधिकारी मात्र गब्बर हाेत आहेत. एवढेच नाही तर अधिकारी ट्रॅक्टर व ट्रक यांच्यात भेदभाव करुन वरिष्ठांना दाखविण्यासाठी ट्रॅक्टरवर कारवाई करता व ट्रकसाठी रानमाेकळे करतात. हे टिप्पर दरराेज दिवसा व रात्री खुलेआम तुमसर तालुक्यातून रेती आणून विक्री करतात. या टिप्पर चालकाजवळ कुठल्याही प्रकारची राॅयल्टी नसते. फक्त पाेलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी साठगाठ केली आहे. तक्रार केली तर त्याला जीवे मारण्याची धमकी देतात.

बाॅक्स

तुमसर व भंडारा मार्गे येते रेती

तुमसर व भंडारा परिसरातील रेती साकाेली येथे टिप्परच्या साहाय्याने आणून विक्री केली जाते. विशेष म्हणजे हे दाेन्ही अंतर जवळपास ५० किमी आहे. तरीही या रेतीचा टिप्परवर कारवाई हाेत नाही हे विशेष. टिप्परला रस्त्यावर जर कुणी अडविले तर टिप्पर चालक पैशाच्या व राजकीय बळाचा वापर करुन धमक्या देतात. त्यामुळे अवैध रेती माफियाचा गाॅडफादर काेण असा प्रश्न आहे.

Web Title: Illegal sale of sand with the help of tipper in Sakali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.