गोसे कालव्याच्या अपूर्ण खोदकामाने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:00 AM2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:01:15+5:30

गोसेखुर्दच्या कामाचे भिजत घोंगडे आहे. वितरिका व कालव्याची अवस्था बिकट झालेली असून कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. जिल्ह्यात महत्वाकांक्षी गोसे प्रकल्प होऊन सुद्धा जिल्हावासियांना सिंचन सुविधा अपेक्षित मिळत नाही. पालांदूर जवळील गुरठा शेत शिवारात गोसे प्रकल्पाचे पाईपलाईनचे काम खोदून अपुरे पडलेले आहे. खरीप हंगाम तोंडावर येऊन मशागतीला आरंभ झाला आहे.

Incomplete excavation of Gose canal puts farmers in crisis | गोसे कालव्याच्या अपूर्ण खोदकामाने शेतकरी संकटात

गोसे कालव्याच्या अपूर्ण खोदकामाने शेतकरी संकटात

Next
ठळक मुद्देकंत्राटदाराचे दुर्लक्ष : खरीप हंगाम होणार प्रभावित, नुकसान भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपल्याने शेतकरी मशागतीच्या कामांना गती दिलेली आहे. मात्र गोसे प्रकल्पाच्या पाईपलाईन नालीचे खोदकाम करून काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील मशागत करताना विविध संकटाचा सामना करावा लागणार आहे. सुमारे एक मीटर रुंद व चार मीटर खोल अशी नाली खोदत पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्याने व पूर्व मोसमी पाऊस रोज हजेरी लावत असल्याने शेतकरी धास्तावलेला आहे.
गोसेखुर्दच्या कामाचे भिजत घोंगडे आहे. वितरिका व कालव्याची अवस्था बिकट झालेली असून कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. जिल्ह्यात महत्वाकांक्षी गोसे प्रकल्प होऊन सुद्धा जिल्हावासियांना सिंचन सुविधा अपेक्षित मिळत नाही.
पालांदूर जवळील गुरठा शेत शिवारात गोसे प्रकल्पाचे पाईपलाईनचे काम खोदून अपुरे पडलेले आहे. खरीप हंगाम तोंडावर येऊन मशागतीला आरंभ झाला आहे. चार मीटर खोलीची नाली लवकरात लवकर बुजवल्या गेली नाही तर या नालीत शेतकरी परिवार अपघातग्रस्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र खरे.
प्रशासनाने व लोकप्रतिनिधीने याबाबत नियमित पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा केली आहे. ज्या शेतकºयांच्या शेतातून नालीचे खोदकाम झालेले आहे त्यांना कोणताही आर्थिक मोबदला देण्याची तरतूद नसल्याचे प्रभावित शेतकºयांनी 'लोकमत'ला सांगितले.
गुरठा येथील यशवंत कठाणे, छबुताई गिरी, गिरधारी मोहतुरे, पुष्पा मोहतुरे, चांगुनाबाई कठाणे, लक्ष्मण गिरि, दामोदर भुरे, मारुती मुंढे, दत्तगिर गिरी, गंभीर मेंढे, जाधव मेंढे, सोविंदा मेंढे, हिरामण वाकडे , सुनिता शिवणकर, हरिदास भुरे, दौलत भुरे, प्रकाश कठाने असे एकूण १७ शेतकरी या नालीपासून प्रभावित झालेले आहेत.

Web Title: Incomplete excavation of Gose canal puts farmers in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.