लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. त्याचा सर्वांनी सन्मान करावयास पाहिजे. संविधानाने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिले आहेत. त्याचे पालन करावे. स्वसंरक्षणार्थ कायद्याने पुष्कळशा गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याचा योग्य वापर करावा असे मौलिक विचार पवनी न्यायालयाचे सहन्यायाधीश एस .एम. पाटील यांनी व्यक्त केले. त्या संविधान दिनानिमित्त सिंदपुरी रुयाळ येथील मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात मुलींना मार्गदर्शन करीत होत्या. मुलींनी आपल्या संरक्षणार्थ बचाव कसा करावा त्याकरीता महत्वपूर्ण असे उपाय त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विशेष सहायक सरकारी अभियोक्ता के.एन. मालानी. विशेष सहाय्यक सरकारी पी.बी.नवनागे, सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर भागवत आकरे उपस्थित होते. यावेळी विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता के.एन. मालानी, पी.बी.नवनागे यांनी मार्गदर्शन केले. वस्तीगृहाच्या प्राचार्य एस.वाय. रामटेके यांनी प्रास्ताविक केले. वकृत्व स्पर्धेत वस्तीगृहाच्या मुलींनी भाग घेतला. स्वीटी इखार, उज्वला खोबरागडे, विशाखा रामटेके, प्रणिता फुलझेले यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्राचार्या रामटेके यांनी मानले. कार्यक्रमासाठी किरण मेश्राम, शीतल भुरे, आर. जी. येरणे यांनी सहकार्य केले.
भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 6:00 AM
संविधानाने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिले आहेत. त्याचे पालन करावे. स्वसंरक्षणार्थ कायद्याने पुष्कळशा गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याचा योग्य वापर करावा असे मौलिक विचार पवनी न्यायालयाचे सहन्यायाधीश एस .एम. पाटील यांनी व्यक्त केले. त्या संविधान दिनानिमित्त सिंदपुरी रुयाळ येथील मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात मुलींना मार्गदर्शन करीत होत्या.
ठळक मुद्देएस.एम. पाटील : वसतिगृहात मार्गदर्शन