शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:38 AM2021-02-09T04:38:21+5:302021-02-09T04:38:21+5:30
भंडारा : वन विभाग व सामान्य जनता यांच्यामध्ये सुसंवाद साधून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, जिल्ह्यामध्ये वन्यप्राण्यांचे जीव ...
भंडारा : वन विभाग व सामान्य जनता यांच्यामध्ये सुसंवाद साधून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, जिल्ह्यामध्ये वन्यप्राण्यांचे जीव वाचविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून जलद उपचार केंद्र (टीटीसी) मंजूर करण्यात आले आहे. वन विभागातील समस्यांविषयी वनमंत्र्यांशी लवकरच भेट घेण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.
महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना नागपूर विभागीय शाखा भंडारा जिल्ह्याची सभा सामाजिक वनीकरण रोपवाटिका कारधा येथे रविवारी पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
सभेच्या पहिल्या सत्रात अध्यक्षस्थानी प्रदेश महासचिव इंद्रजीत बारस्कर होते. उद्घाटन वृत्त अध्यक्ष संजय भेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून प्रदेश कोषाध्यक्ष शैलेंद्र भदाने, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर, उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, साकेलीचे सहायक वनसंरक्षक आर. पी. राठोड, माजी केंद्रीय अध्यक्ष विजय मेहर, सामाजिक वनीकरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण, वन संघटनेचे युवराज रामटेके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये प्रतिरेंज दोन विभागीय सदस्यांमधून विभागीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात अध्यक्ष सुनील वैद्य, कार्याध्यक्ष विनोद पंचभाई, सचिव सचिन कुकडे, कोषाध्यक्ष रूपाली राऊत, महिला प्रतिनिधी वैशाली सौंदडे, तर विभागीय सदस्य म्हणून खुशाल नंदरधने, सुधीर हुकरे, सुनील भुरे, आर. जी. मेश्राम, प्रशांत गजभिये, अनिल झंझाळ, कांचन कावळे, राकेश कोदाने चंदू सार्वे, राहुल लखवाल, आर. आर परतेती, डेव्हिड मेश्राम, अनिल नरडंग, विपीन डोंगरे, प्रवीण ढोले, महेंद्र चांदेवार, रमेश लोहबरे, प्रमोद फुले, एकनाथ पवार, सुषमा नरवडे, बबीता डोरले आदींचा समावेश आहे.
सूत्रसंचालन डेविड मेश्राम यांनी तर, आभार हरी जायभाये यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल आर. टी. मेश्राम यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी भंडारा जिल्ह्यातील सर्व वनरक्षक वनपाल यांनी अभिनंदन केले.