३६ गावांत गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:40 AM2021-09-12T04:40:54+5:302021-09-12T04:40:54+5:30
गत दोन वर्षांपासून देशात व राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यावर आळा घालण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असतानाच गणेशचतुर्थीच्या ...
गत दोन वर्षांपासून देशात व राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यावर आळा घालण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असतानाच गणेशचतुर्थीच्या पर्वावर ‘एक गाव - एक गणपती’ संकल्पना राबवीत गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानुसार लाखांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४८ गावांपैकी २८ गावांत, तर दिघोरी मोठी पोलीस ठाणे हद्दीतील २२ गावांपैकी ८ गावांत ‘एक गाव - एक गणपती’ या संकल्पनेवर गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
या प्रतिष्ठापनेअंतर्गत संबंधित गणेशोत्सव मंडळाला कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना सांगितल्या आहेत. यात मंडपात पूजेच्या वेळी कमीत कमी लोकांत पूजा करावयाची आहे. मंडळात प्रवेश देताना संबंधिताजवळ मास्क असल्याची खात्री करूनच आत प्रवेश द्यायचा आहे. मंडपात गर्दी होणार नाही असे सामाजिक अंतर ठेवूनच उभे राहायचे आहे. प्रत्येक गणेशोत्सव मंडळात रात्रीच्या वेळी एक स्वयंसेवक असणे आवश्यक आहे. सोबतच कोरोनाविषयक अन्य शासन नियमांचे पालन करण्याचे आवाहन दोन्ही पोलीस ठाण्याअंतर्गत करण्यात आले आहे.