‘त्या’ अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:25 AM2021-07-16T04:25:26+5:302021-07-16T04:25:26+5:30
निवेदनानुसार, पाच वर्षांपासून चालत आलेल्या उत्खननामुळे त्या ठिकाणी मोठ-मोठे जीव घेणारे खड्डे तयार झाले आहेत. रस्त्याची सुद्धा ...
निवेदनानुसार, पाच वर्षांपासून चालत आलेल्या उत्खननामुळे त्या ठिकाणी मोठ-मोठे जीव घेणारे खड्डे तयार झाले आहेत. रस्त्याची सुद्धा दुरवस्था झाली आहे. त्या खोल जीवघेण्या खड्ड्यांमुळे जवळपासच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचत असल्यामुळे पिकांचेसुद्धा नुकसान होत आहे. उत्खनन झालेल्या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असल्यामुळे त्यामध्ये पाणी साचले आहे. गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. यामध्ये गावातील गुराढोरांसह गावकऱ्यांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लिजधारकाची कोणत्याही प्रकारची चौकशी न करता लिजधारकाशी संगनमत करून तो परवाना रद्द केला. मात्र याबाबत कोणत्याचप्रकारे दंड आकारण्यात आलेला नाही. त्यामुळे टेकडी उत्खननप्रकरणी जिल्हा प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची शक्यता नाकारता येत नाही.