रेल्वेची मासिक पास देणे दीड वर्षापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:38 AM2021-08-27T04:38:55+5:302021-08-27T04:38:55+5:30
कोरोनाच्या दुसरी लाट ओसरल्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवासी गाड्या सुरू केल्या त्यात एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे. दररोज अपडाऊन करणाऱ्या रेल्वे ...
कोरोनाच्या दुसरी लाट ओसरल्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवासी गाड्या सुरू केल्या त्यात एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे. दररोज अपडाऊन करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मात्र मासिक पास देणे अद्यापही बंद आहे त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दररोज तिकीट आरक्षण करूनच प्रवास करावा लागतो. यात त्यांना आर्थिक भुर्दंड बसत असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
गोंदिया नागपूर रेल्वे मार्गावर दररोज शेकडो व्यावसायिक, नोकरदार वर्ग व विद्यार्थी अप-डाऊन करतात या सर्वांना आरक्षण करूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. मुंबई व भोपाळ मंडळात रेल्वे प्रशासनाने मासिक पास देणे सुरू केले. परंतु नागपूर विभागात अजूनपर्यंत मासिक पास देणे सुरू केले नाही. ज्यांनी कोरोनाची दोन लस घेतली आहे. त्यांना मासिक पास द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रा.कमलाकर निखाडे यांनी नागपूर येथील विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकाकडे केली आहे.