भंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार कामगारांना १८ हजार रूपये किमान वेतन आणि पाच हजार रूपये पेन्शन देण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (आयटक) देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरात मोर्चा काढण्यात आला.भाकपचे नेता शिवकुमार गणवीर, माधवराव बांते, आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष हिवराज उके यांच्या नेतृत्वात दुपारी १ वाजता मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषदेसमोर सायंकाळी ५ वाजता धरणे दिले. आयटकच्या एक शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी विविध विभाग प्रमुखांशी चर्चा करून ग्रामपंचायत कर्मचारी, आंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्ता यांच्या स्थानिक स्तरावरच्या मागण्या आणि समस्यांकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. त्यापूर्वी आयटकने मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
आयटकचा भंडाऱ्यात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:15 AM