या रस्त्याच्या बांधकामात कमी प्रमाणात मुरूम वापरल्यामुळे सदर रस्ता काही दिवसातच उखडला असून पूर्णत: गिट्टी बाहेर निघाली आहे. रस्ता बांधकाम सुरू असताना रस्त्याच्या गुणवत्तेशी खेळ केला व याकडे अभियंता व अधिकाऱ्यांचे पूर्णत: दुर्लक्ष असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. या रस्त्याचे खडीकरण होताच काही दिवसात रस्ता पूर्णत उखडला व गिट्टी बाहेर निघाली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहने चालवावी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या रस्त्यावरून मुले, शेतकरी व अन्य वाहतूकदारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्ता कामाची चौकशी करण्यात यावी व त्वरित खैरलांजी फाटा ते खैरलांजी रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाची दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी खैरलांजी येथील गावकऱ्यांनी केली आहे,
अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. अनेक दिवसांपासून रस्ता काम प्रलंबित असल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.