मोहन भोयर।आॅनलाईन लोकमततुमसर : तुमसर येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक कार्यालयात आठवड्यातून केवळ दोन ते तीन दिवस नियमित राहतात अन्य दिवशी कार्यालयीन बैठका, न्यायालय व इतर कामानिमित्त बाहेर राहतात. त्यांच्या कार्यालयाबाहेर केवळ मंगळवार उपस्थितीचा दिवस असे एका कागद भिंतीवर चिटकविण्यात आला आहे. अभिलेख निर्लेखिकता शासनाचा उपक्रम सुरू असून कार्यालयाच्या वºहांड्यात महत्त्वपूूर्ण जूना दस्ताऐवज कचऱ्यासमान पडून आहे. नियमित उपअधिक्षक शासनाने नियुक्त केल्यावरही कार्यालयात नियमित उपस्थिती नाही. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाºयांचे येथे दुर्लक्ष आहे.तुमसर शहर व तालुक्याकरिता राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमी अभिलेख कार्यालय मंजूर केले. उपअधिक्षक तथा डझनभर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. शेती, भूखंड, घर व इतर महत्वपूर्ण दस्ताऐवज तयार करणे, सुरक्षित ठेवणे, गट क्रमांक देणे, नकाशा, मोजणी करणे अशी महत्वपूर्ण कामे या कार्यालयाकडून केली जातात. भूमी अभिलेख प्रशासन गतिमान करण्याचा दावा करण्यात येत असला तरी कागदपत्रांचा ससेमीरा सामान्य जनतेचा पाठलाग करीत आहे. प्रत्येक कागद शेती, भूखंड, घर इत्यादी या कार्यालयाकडे यावे लागते. ब्रिटीश काळापासून हा विभाग कार्यरत आहे.काही महिन्यापुर्वी येथे एस.टी. खोंडे उपअधिक्षक पदावर नियमित रूजू झाले. परंतु त्यांच्या कार्यालयाबाहेर दर मंगळवारी भेटण्याचा दिवस वेळ दुपारी २ ते ५ असे नमूद केलेला कागद भिंतीवर चिकटविण्यात आला आहे. दर्शनी भागात माहितीचा अधिकार अनियमित फलक खाली ठेवला असून त्यावर जन माहिती अधिकारी म्हणून पी.टी. मोरावकर असे नमूद केले आहे. शुक्रवारी एस.टी. खोडे कार्यालयातून दुपारी २ च्या सुमारास नझुलचे अतिक्रमणाचा आढावा घेतो म्हणून निघून गेले. शनिवारी ते कार्यालयात आलेच नाही. कागदी फलकावर मंगळवार दिवस न काढण्यामागचे कारण काय, हा मुख्य प्रश्न आहे.कार्यालयातील कर्मचाºयाकरिता नियमानुसार हलचल रजिस्टर असतो. इतर कर्मचारी बाहेर जातांनी नोंद करतात, असे कार्यालयात सांगण्यात आले. उपअधिक्षक हलचल रजिस्टरवर नोंद करण्याचा नियम नाही. ते भंडारा येथे नोंद करतात अशी माहिती कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांनी दिली.२००३ मध्ये भूमि उपअधिक्षक कार्यालयाने तुमसर शहरातील भूखंडाचे गट क्रमांकात बदल केला होता. दवंडी, तथा नोटीस कुणलाच दिली नाही. ज्यांनी फेरफार केला नाही अशा शेकडो भुखंडधारकांना त्याचा फटका बसला आहे. जुने मालक तथा इतर गटातील लोकांचे नावावर भुखंड गेले आहेत. त्या आधारावरच तलाठी कार्यालयाने नोंद केली. सध्या शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत. नियमित उपअधिक्षक नियुक्त केल्यावर कार्यालयीन वेळेत पूर्ववेळ न राहिल्याने दररोज अनेक गरजूंना रिकाम्या हाताने परतावे लागते.तुमसर येथे अभिलेख कार्यालयात नियमित उपअधीक्षक म्हणून कार्यरत असून कार्यालयात नियमित हजर असतो. बैठका, न्यायालय व इतर कामांकरिता जावे लागते. भिंतीवरील कागद जूना आहे.-एस.टी. खोडे, उपअधीक्षक,भूमी अभिलेख कार्यालय तुमसर.
भूमि अभिलेख कार्यालय वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:07 PM
तुमसर येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक कार्यालयात आठवड्यातून केवळ दोन ते तीन दिवस नियमित राहतात अन्य दिवशी कार्यालयीन बैठका, न्यायालय व इतर कामानिमित्त बाहेर राहतात.
ठळक मुद्देनियमित उपअधीक्षक असतानाही प्रकार : वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष