राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : लोकसभेच्या प्रचाराचा हंगाम सुरु आहे. उष्णतेचा तडाख्यात नेते प्रचारात गुंतले आहेत. प्रचारात अनेक दिग्गज नेत्यांचे दर्शन सुलभ होते. अशाच निवडणुकीच्या प्रचारात अनेक दिग्गज नेत्यांना बघण्याचा योग मोहाडीकरांना आला. तसेच अभिनेत्यांनाही जवळून बघता आले.लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी थांबायला आठ-नऊ दिवस शिल्लक राहिले आहेत. उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मोठमोठे नेते सभेच्या मैदानात उतरणार आहेत. अशा या निवडणुकीच्या रणसंग्रामात सामान्य नजतेला दिग्गज नेत्यांना बघण्याची संधी मिळत असते. मागील लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मोहाडीकरांनी दिग्गज नेत्यांचे दर्शन केले आहेत.मोहाडीच्या भूमिला शरद पवार, आर.आर. पाटील, छगन भुजबळ, सुनील दत्त, शालिनीताई पाटील, जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, कमुनिष्ट पक्षाचे ए. बी. बर्धन, डी. राजा, अॅड. गोविंद पानसरे, माधवराव गायकवाड, अतुलकुमार अंजान, तसेच भाजपाचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे, उमा भारती, मेनका गांधी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांचे पाय पडले. तसेच अभिनेत्यापैकी प्रसिध्द अभिनेते जितेंद्र, सुनील शेट्टी, असरानी, मुकेश खन्ना, वर्षा उसगावकर यांचेही दर्शन झाले. तसेच भारताच्या इतिहासात भंडारा-गोंदियाचा नाव झळकविणारे राष्टÑवादीचे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी तर आपल्या राजकीय कारकिर्दीत गाव अन् गाव पिंजून काढले आहे.मोजून आता आठ-नऊ दिवस प्रचाराला शिल्लक आहेत. पण मोहाडी येथे एकही दिग्गज नेता- अभिनेता प्रचाराला आलेला नाही. रखरखत्या उन्हात, तप्त मातीवर मोहाडीस आधी कोण पाय ठेवतो याची प्रतीक्षा मोहाडीकरांना लागली आहे.मोहाडीत इंदिरा गांधींची सभा१९७७ ते मागील २०१८ पर्यंतचा कालखंडात नजर टाकली असता सर्वप्रथम आठवण होते. नेतृत्वाची कमान सांभाळलेल्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची. त्या हुतात्मा स्मारकाच्या परिसरात प्रचारासाठी आल्या होत्या. त्यांना बघायला परिसरातील जनता बैलगाडी, खाचर, सायकल व पायदळ आली होती. खूप रात्री झाली असतांनाही इंदिराजींची एक झलक बघण्यासाठी आतुरलेल्या थोर महिला पुरुष बालकांनी सुध्दा जागा सोडली नव्हती.
नेते-अभिनेत्यांनी गाजविल्या जिल्ह्यात सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 10:53 PM
लोकसभेच्या प्रचाराचा हंगाम सुरु आहे. उष्णतेचा तडाख्यात नेते प्रचारात गुंतले आहेत. प्रचारात अनेक दिग्गज नेत्यांचे दर्शन सुलभ होते. अशाच निवडणुकीच्या प्रचारात अनेक दिग्गज नेत्यांना बघण्याचा योग मोहाडीकरांना आला. तसेच अभिनेत्यांनाही जवळून बघता आले.
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : अभिनेत्यांच्या सभेची ग्रामीण भागात उत्सुकता