शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

युती करू तर घट्ट करू

By admin | Published: July 09, 2015 12:34 AM

जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १९ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ उमेदवार निवडून आले आहेत.

सेवक वाघाये : पत्रपरिषदेत दिली माहितीभंडारा : जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १९ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेस हा मोठा पक्ष म्हणून आघाडीवर आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करायची असल्यास ती घट्ट करू अन्यथा करणार नाही, असे ठाम मत माजी आमदार सेवक वाघाये यांनी व्यक्त केले. आज सायंकाळी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी प्रथमच पत्रपरिषद घेतली. यावेळी सेवक वाघाये म्हणाले, मागील अनुभव लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यावेळी आम्ही प्रस्तावाबाबत चर्चा करणार नाही. मात्र राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आल्यास जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करण्यावर चर्चा केली जाईल. राष्ट्रवादीसोबत युती करायची की नाही याबाबत दि. १० जुलै रोजी राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. यात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यावरच युती संदर्भात निर्णय घेतल्या जाईल. त्याचदिवशी जिल्हा परिषद सदस्यांमधून गटनेत्याची निवड केली जाईल. सध्या काँग्रेसकडे १९ सदस्य असून तीन अपक्ष उमेदवारांचा पाठींबा मिळाला आहे. एका अपक्ष सदस्यासह शिवसेनेच्या विजयी उमेदवाराशी आमची चर्चा सुरु असल्याचे सांगितले. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसशी युती झाल्यास जिल्हा परिषदेत त्यांच्या वाट्याला फक्त दोन पद दिले जातील. यात एक उपाध्यक्षपद व एक सभापतीपद किंवा दोन्ही सभापतीपद दिले जातील. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला लवकरच नवीन अध्यक्ष दिले जाणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्याकडे सोपविल्यास ती आपण पार पाडणार काय? या प्रश्नाच्या उत्तरावर वाघाये यांनी आपला होकार दर्शविला. पत्रपरिषदेला नवनियुक्त जि.प. सदस्य प्राचार्य होमराज कापगते, रमेश डोंगरे, प्रदीप बुराडे, ज्ञानेश्वर राहांगडाले, पंधरे, मनोहर राऊत आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद निवडणुकीत चर्चा नसतानाही काँग्रेस पक्षाला दमखमपणे निवडणुकीत दमदार यश मिळाले. त्यामुळे सेवक वाघाये यांची आशा बळावली आहे. आजच्या पत्रपरिषदेतही सेवक वाघाये यांनी आगामी निवडणुकीसंदर्भातही काँग्रेस हा पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सुतोवाच केले. (प्रतिनिधी)