सरांडी बु येथे नागाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:29 AM2021-05-03T04:29:34+5:302021-05-03T04:29:34+5:30

लाखांदुर : तालुक्यातील सरांडी बु येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील स्वयंपाकगृहात दडी मारून असलेल्या जवळपास ४ फूट सापाला सर्पमित्राच्या साहाय्याने ...

Life of Naga at Sarandi Bu | सरांडी बु येथे नागाला जीवदान

सरांडी बु येथे नागाला जीवदान

Next

लाखांदुर : तालुक्यातील सरांडी बु येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील स्वयंपाकगृहात दडी मारून असलेल्या जवळपास ४ फूट सापाला सर्पमित्राच्या साहाय्याने जंगलात जिवंत सोडून जीवनदान दिल्याची घटना घडली. सदर घटना लाखांदूर तालुक्यातील सरांडी बु येथे ३० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली.

सरांडी बु येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील स्वयंपाकगृहात स्वच्छतेदरम्यान साप आढळून आला. सदरची माहिती गावातील सर्पमित्र जागेश्वर कांबळे यांना देण्यात आली. यावेळी संबंधित सापाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

दरम्यान, येथील काही गावकऱ्यांनी सदर घटनेची माहिती वनविभागाला देत, सर्पमित्राला बोलावून घेतले. त्यानुसार, सर्पमित्र जागेश्वर कांबळे यांनी जवळपास ४ फूट लांबीच्या नाग सापाला पकडून जवळच्या दांडेगाव जंगलात जिवंत सोडून दिले.

Web Title: Life of Naga at Sarandi Bu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.