आॅनलाईन लोकमतलाखनी : येथील ग्रीन फ्रेन्डस् नेचर क्लब तर्फे लाखनी शहरात कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम (सीबीएमपी) हिवाळी पक्षीगणना कार्यक्रम राबविण्यात आला. या हिवाळी पक्षीगणनेमध्ये सिद्धार्थ विद्यालय सावरी तसेच समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.पक्षीनिरीक्षण सुरु करण्यापूर्वी ग्रीन फ्रेन्डस् नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने, सिद्धार्थ विद्यालय सावरीचे हरित सेना शिक्षक दिलीप भैसारे, ग्रीन फ्रेन्डस्चे पदाधिकारी अशोक वैद्य, ग्रीन फ्रेन्डस्चे सहकारी नितीन पटले, पंकज कावळे, वज्रेश मेश्राम, भूषण धांडे, रोहित देशमुख, अमन लांजेवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध पक्षी कसे ओळखावे यावर मार्गदर्शन केले. नेचर क्लब संघटक प्रा.अशोक गायधने यांनी पक्षी छायाचित्रे दाखवून त्यांची विशेष ओळख करून दिली. यानंतर सीबीएमपी (कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम) हिवाळी पक्षीगणनेला शेंदरे नर्सरी पासून सुरुवात करण्यात येऊन समर्थ मैदान, रेस्ट हाऊस परिसर, तलाव परिसर लाखनी हायवेचे मुख्य भाग, बसस्थानक परिसर ते लाखनी बाजार समिती परिसर हा दोन चौकिमी टापू बीएनएचएस मुंबईच्या निर्देशानुसार करण्यात आला.या पक्षीगणनेत साळुंखी ९, पोपट २०, सूर्यपक्षी ३, वेडा राघू ५२, बगर्ळं ३९, कोतवाल ७, ब्राम्हणी मैना ३, सुतार २, पिंगळा ३, लाफींग कवडी ३, पिठोरी कवळी १०, पकेवाला टोला ४, दयाळ १०, बुश चाट ७, वाईड मैना ३, पाकोळी १२५, चिमणी १७, कावळे ६७, घार १, कापशी १ असे एकंदर २९ जातीचे ३०० पेक्षा जास्त पक्षी आढळले. या पक्षीगणनेला सिद्धार्थ विद्यालयाचे आलोक शेंडे, रजत चाचेरे, प्रज्वल मोहनकर, आनंद चाचेरे, अल्पेश वालदे, प्रतीक राऊत, अरमान देटे, ओमप्रकाश खवसकर, जीवनदास सातपुते, रितेश निर्वाण, मयूर शिंगनजुडे, देवेंद्र नागदेवे, सागर टिचकुले, आशिष शहारे, निलेश राऊत, समर्थ विद्यालयाचे कुंदन शेंदरे, ऋषीकेश तुमडाम, रोहित मडावी, वज्रेश मेश्राम, भूषण धांडे, रोहित देशमुख, अमन लांजेवार यांनी सहकार्य केले. पक्षीगणना अहवाल सीबीएमपीचे प्रोजेक्ट डायरेक्टर बीएमएचएसचे नंदकिशोर दुधे यांचेकडे पाठविण्यात आला.
लाखनीत सीबीएमपी हिवाळी पक्षी गणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 10:17 PM
येथील ग्रीन फ्रेन्डस् नेचर क्लब तर्फे लाखनी शहरात कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम (सीबीएमपी) हिवाळी पक्षीगणना कार्यक्रम राबविण्यात आला.
ठळक मुद्देग्रीन फ्रेन्डसचा उपक्रम : दोन चौ.कि.मी. टापूत आढळले २९ प्रकारचे ३०० पेक्षा जास्त पक्षी