विदर्भ राज्य आंदोलन समितीची निवेदनातून मुख्यमंत्र्यांना मागणी
लाखांदूर : महाराष्ट्राचाच भाग असलेल्या विदर्भाला काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी वेगळा करण्याचे आश्वासित केले होते. मात्र, दोन वेगवेगळ्या वेळी दोन्ही पक्षांची सत्ता स्थापन होऊन देखील वेगळा विदर्भ करण्यात आला नसून विदर्भाला सावत्रपणाची वागणूक देत असल्याचा आरोप करीत विदर्भ स्वतंत्र राज्य करा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन २६ ऑगस्ट रोजी तालुका विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे येथील तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
प्राप्त निवेदनानुसार, वेगळा विदर्भ व्हावा ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. काँग्रेस व भाजपाने देखील स्वतंत्र विदर्भ राज्य करण्याचे आश्वासित केले होते. मात्र, दोन्ही पक्षांचे दोन वेगवेगळ्या वेळी सरकार स्थापन होऊन देखील स्वतंत्र विदर्भ राज्य झाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाच्या तुलनेत अत्यंत सावत्रपणाची भूमिका बाळगली जात आहे. विदर्भात उद्योगधंदे नसल्याने बेकारीची फौज उभी झाली आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. शैक्षणिक मागासलेपणा यांसारख्या अनेक संकटांना विदर्भातील जनतेला सामना करावा लागत असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. विदर्भात मुबलक प्रमाणात खनिज, वन, पाणी, वीज व सुपीक जमीन असताना देखील राज्य सरकारच्या विदर्भद्वेषाच्या धोरणामुळे विदर्भाचा व विदर्भातील जनतेच्या उद्धाराकरिता स्वतंत्र विदर्भ राज्य करण्यात यावा या मागणीचे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
विदर्भ स्वतंत्र राज्य करा या मागणीचे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लाखांदूर येथील तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांच्यामार्फत पाठवितेवेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष विश्वपाल हजारे, कोअर कमिटी सदस्य मोरेश्वर बोरकर, माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, महासचिव जितेंद्र ढोरे, उपाध्यक्ष पवन समरत, नरेश सोनटक्के यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होेते.
260821\img20210826134858.jpg
निवेदन देतांना विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी