दुसऱ्या लग्नाचा डाव फसला; पहिली पत्नी धडकली लग्नमंडपात अन्..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 01:07 PM2023-01-13T13:07:44+5:302023-01-13T13:14:02+5:30

मासळच्या तरुणाचा पराक्रम : लग्नाला आलेल्या पाहुण्यांची उडाली तारांबळ

man's plan of second marriage failed as the first wife reaches to marriage hall, situation go worst | दुसऱ्या लग्नाचा डाव फसला; पहिली पत्नी धडकली लग्नमंडपात अन्..

दुसऱ्या लग्नाचा डाव फसला; पहिली पत्नी धडकली लग्नमंडपात अन्..

Next

लाखांदूर (भंडारा) : घरी पत्नी व मुलगा असताना दुसऱ्या लग्नाचा डाव रचला जात असतानाच पहिली पत्नी थेट लग्नमंडपात धडकली. त्यामुळे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची एकच तारांबळ उडाली. लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील तरुणाचा हा पराक्रम कल्याण (मुंबई) येथे उघडकीस आला. पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

खेमराज बाबुराव मुल (४०, रा. मासळ, ता. लाखांदूर) हा पेंटचा व्यवसाय करतो. १५ वर्षांपूर्वी प्रेमसंबंधातून गावातीलच मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते. काही दिवस पत्नीसोबत गोडीगुलाबीने राहिला. त्यांना मुलगाही झाला. मात्र, काही दिवसांतच त्यांच्यात बेबनाव सुरू झाला. पत्नीविरोधात घटस्फोटाची केस न्यायालयात दाखल केली. हे प्रकरण न्यायालयात असतानाच दुसऱ्या लग्नाची तयारी चालवली. पत्नीला हा प्रकार कळला. लग्नाची तारीख माहीत करून घेत पतीचा डाव उधळण्यासाठी ती विवाहस्थळी मुलगा, भाऊ, बहिणीसह कल्याण (पूर्व) येथील दर्शन मॅरेज हॉलमध्ये धडकली. यातील वर-वधू लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज असताना पहिल्या पत्नीने पोलिसांच्या मदतीने लग्नाचा डाव उधळला. दुसरे लग्न करणाऱ्या पतीला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांनी खेमराज मुल याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कल्याणमधील (मुंबई) कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भादंवि ४९४, ५११, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक निशा चव्हाण करत आहेत. प्रेमविवाह केल्यानंतर दुसरे लग्न करण्याचा डाव उधळल्याची महिती मासळ येथे समजताच एकच खळबळ उडाली.

Web Title: man's plan of second marriage failed as the first wife reaches to marriage hall, situation go worst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.