पवनी तालुका जुनी पेन्शन हक्क संघटनेची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:38 AM2021-08-27T04:38:53+5:302021-08-27T04:38:53+5:30
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष मडावी यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सरचिटणीस परमेश्वर एनकीकर,राज्य संपर्क प्रमुख सुधीर माकडे, ...
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष मडावी यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सरचिटणीस परमेश्वर एनकीकर,राज्य संपर्क प्रमुख सुधीर माकडे, माजी जिल्हा अध्यक्ष आशिष खंडाते, जिल्हा शालार्थ समन्वयक देवानंद घरत, राज्य संघटक डी. एस. हाके उपस्थित होते. अतिथींच्या मार्गदर्शनाखाली पवनी तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सभेत तालुका कार्यकारिणी विस्तार करणे,एनपीएसबाबत शंका समाधान करणे, संघटनेच्या आंदोलनाची पुढील रूपरेषा आखणे,त्यात हिवाळी अधिवेशनात पेन्शन मार्च मोर्च्यात जुनी पेन्शनची मागणी लावून धरणे,केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना एनपीएस लागू करणे व १० वर्षाच्या आत एनपीएसधारक मृत पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना किमान दहा लक्ष रुपये लाभ देणे इत्यादी बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. एनपीएस विषयी सर्व कर्मचाऱ्यांचे शंका समाधान व मार्गदर्शन शालार्थ समन्वयक देवानंद घरत यांनी केले, संघटनेची पुढील वाटचाल कशी असेल हे जिल्हाध्यक्ष संतोष मडावी यांनी स्पष्ट केले.
नव्याने स्थापन केलेल्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष-विशाल बोरकर , सचिव-पांडुरंग धकाते, कार्याध्यक्ष-विश्वास बोरकर कोषाध्यक्ष-राम पवार, प्रवक्ता-विमोश चव्हाण, अन्य विभाग प्रमुख-भोजराज दिघोरे, मुख्य संघटक-शिवम घोडीचोऱ सल्लागार-अनिल मर्सकोल्हे, संपर्क प्रमुख-प्रमोद बांगडकर, महिला मुख्य संघटक- प्रीती कोचे, मार्गदर्शक-उत्तम कुंभारगावे, मकरंद घुगे यांची निवड करण्यात आली. सभेला धर्मराज रुपनर, प्रीती कोचे,नीलिमा निनावे, सदानंद बागलावे,रमेश बलकार,राम पवार,बी एम सलामे, प्रेमदास जाधव,नंदा माहोरे,अतुल आघाव,राजेश वाकडीकर,शिवम घोडीचोर,सुनील आत्राम,पांडुरंग धकाते,बी. बी. मिसाळ, एस. एन. खेताडे, उत्तम कुंभारगावे, विशाल बोरकर,विमोश चव्हाण उपस्थित होते. सभेचे संचालन शिवम घोडीचोर यांनी केले.
260821\img-20210825-wa0015.jpg
photo