पेड न्यूज, इलेक्ट्रॉनिक्स व सोशल मीडियाचे सुक्ष्म संनियंत्रण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 09:25 PM2019-03-19T21:25:42+5:302019-03-19T21:26:03+5:30
लोकसभा निवडणुकीदरम्यान वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या पेड न्यूज, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया व सोशल मिडीयावर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती व बातम्यांचे माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून सुक्ष्म सनियंत्रण केले जाईल. पेड न्यूज आढळल्यास संबंधितांच्या निवडणूक खर्च खात्यात खर्च समाविष्ट करावा अशी सूचना निवडणूक खर्च निरीक्षक नाकिडी सृजनकुमार यांनी येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीदरम्यान वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या पेड न्यूज, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया व सोशल मिडीयावर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती व बातम्यांचे माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून सुक्ष्म सनियंत्रण केले जाईल. पेड न्यूज आढळल्यास संबंधितांच्या निवडणूक खर्च खात्यात खर्च समाविष्ट करावा अशी सूचना निवडणूक खर्च निरीक्षक नाकिडी सृजनकुमार यांनी येथे दिली.
जिल्हा माहिती कार्यालयात लोकसभा निवडणुकीसाठी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मिडीया सेंटरचे उद्घाटन सृजनकुमार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. नोडल अधिकारी निवडणूक खर्च तथा जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, निवडणूक खर्च निरीक्षकांचे संपर्क अधिकारी श्रीकांत सुपे उपस्थित होते.
निवडणूक खर्च निरीक्षक सृजनकुमार हे राजस्व सेवेचे अधिकारी असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने त्यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मंगळवारी त्यांनी मिडीया सेंटरला भेट देऊन उद्घाटन केले. यावेळी सृजनकुमार यांनी समितीमार्फत पाठविण्यात येणाºया विविध अहवालांची पाहणी केली. समितीच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार समितीने यापुढेही नियमित अहवाल सादर करावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.