आयएफसी कोडमध्ये अडले १,४४० शेतकऱ्यांचे चुकारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:36 AM2021-07-28T04:36:38+5:302021-07-28T04:36:38+5:30

करडी (पालोरा) : आर्थिक वर्षभरापूर्वी डबघाईमुळे अलाहाबाद बँक (इंडियन बँक) व देना (बँक ऑफ बडोदा) बँकेचे विलीनीकरण झाले. दोन ...

Mistakes of 1,440 farmers in IFC Code | आयएफसी कोडमध्ये अडले १,४४० शेतकऱ्यांचे चुकारे

आयएफसी कोडमध्ये अडले १,४४० शेतकऱ्यांचे चुकारे

Next

करडी (पालोरा) : आर्थिक वर्षभरापूर्वी डबघाईमुळे अलाहाबाद बँक (इंडियन बँक) व देना (बँक ऑफ बडोदा) बँकेचे विलीनीकरण झाले. दोन महिन्यांपूर्वी दोन्ही बँकांमध्ये उन्हाळी धानाचे चुकारे व बोनस रक्कम प्राप्त झाली; परंतु मोहाडी तालुक्यातील दोन्ही बँकांच्या शाखांनी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यांचे आयएफसी कोड बदलविले नाहीत. परिणामी, बोनसची व उन्हाळी धानाची रक्कम १,४४० शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. बँकेचे अधिकारी म्हणतात, संबंधितांनी नवे कोड टाकून परत यादी पाठविली पाहिजे, तर संस्था म्हणतात, ही जबाबदारी बँकेची आहे. या घोळात पैसा अडल्याने शेतकऱ्यांत असंतोषाची भावना आहे.

राज्य शासनाने खरीप धानासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने ७०० रुपयांच्या बोनसची घोषणा केली होती. महिनाभरापूर्वी त्यापैकी ५० टक्के रक्कम, तसेच उन्हाळी धानाचे चुकारे सर्व बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले; परंतु पालोरा येथील अलाहाबाद बँक व मोहाडीतील देना बँकेतील खातेधारक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही जमा झालेली नाही. आर्थिक संकटात सापडलेल्या अलाहाबाद बँक व देना बँकेचे विलीकरण होऊन वर्षभराचा कालावधी लोटला आहे. मात्र, खातेधारकांसाठी लागू केलेले नवे आयएफसी कोड बँकांनी बदलविले नसल्याने हा घोळ निर्माण झालेला आहे.

१,०६२ शेतकऱ्यांचा अडला बोनस

बोनसची रक्कम अडलेल्या धान खरेदी केंद्रामध्ये मोहाडी तालुका खरेदी- विक्री सहकारी संस्थेच्या वतीने संचालित मोहाडी येथील ७० शेतकऱ्यांचे ८ लाख ६३ हजार १७० रुपये, मोहगाव देवी येथील १४ शेतकऱ्यांचे १ लाख ६९ हजार ४०० रुपये देना बँकेत, तर पालोरा धान खरेदी केंद्रातील ५०३ शेतकऱ्यांचे ३९ लाख एक हजार ९०५ रुपये अलाहाबाद बँकेत अडकले आहेत, तसेच डोंगरदेव धान खरेदी केंद्रातील ३३८ व करडी येथील १४७ शेतकऱ्यांची बोनसची रक्कम प्राप्त झालेली नाही.

३७८ शेतकऱ्यांचे अडकले उन्हाळी चुकारे

डोंगरदेव धान खरेदी केंद्रातील ३४५ व करडी केंद्रातील ३३ शेतकऱ्यांचे उन्हाळी धानाचे चुकारे पालोरा येथील अलाहाबाद बँकेत अडकले आहेत. शेतकरी वारंवार चुकाऱ्यासाठी बँकांच्या चकरा मारत आहेत. खरीप हंगामातील रोवण्यांना प्रारंभ झाला आहे; परंतु अद्यापही शेतकऱ्यांना बोनस व उन्हाळी धानाची रक्कम प्राप्त झालेली नाही. दोन्ही बँकांच्या निष्काळजीपणाचा फटका शेतकऱ्यांसह संस्थांना सहन करावा लागतो आहे.

बॉक्स

अन्याय सहन करणार नाही

अलाहाबाट व देना बँकांनी खातेधारकांच्या आयएफसी कोडमध्ये त्वरित बदल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा तालुका खरेदी- विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष माधवराव बांते, डोंगरदेव केंद्राचे संचालक व पालोराचे सरपंच महादेव बुरडे, करडीचे ग्रेडर तितिरमारे यांनी दिला आहे.

आयएफसी कोड बदलाची माहिती संबंधित संस्थांना दिली आहे. त्यांनी खातेधारक शेतकऱ्यांचे कोड बदलविलेली यादी नव्याने पाठवायला हवी. बँकेचे काम फक्त खातेधारकांच्या खात्यात पैसा जमा करण्यापुरते आहे.

-हर्षल महादुले,

व्यवस्थापक इंडियन बँक शाखा, पालोरा

270721\img_20210727_111732.jpg

आयएफसी कोडचा घोळ : १,४४० शेतकऱ्यांचे बोनस व उन्हाळीचे चुकारे अडले फोटो पालोरा येथील इंडीयन बॅक

Web Title: Mistakes of 1,440 farmers in IFC Code

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.