रास्ता रोको आंदोलनापुढे नमले प्रशासन
By admin | Published: June 9, 2017 12:41 AM2017-06-09T00:41:23+5:302017-06-09T00:41:23+5:30
लाखनी तालुक्यातील बोरगाव येथील शाळेच्या पटांगण सपाटीकरणावरून एक वर्षापूर्वी सपाटीकरण
अधिकाऱ्यांचे आश्वासन : प्रकरण बोरगाव येथील शाळा पटांगण सपाटीकरणाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव / लाखनी : लाखनी तालुक्यातील बोरगाव येथील शाळेच्या पटांगण सपाटीकरणावरून एक वर्षापूर्वी सपाटीकरण कामात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी अखेर शिवसेना कार्यकर्त्यांना रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. या आंदोलनापुढे प्रशासनाला नमावे लागले. दोषींकडून वसुली कार्यवाही करण्याचे आदेश काढून सदर प्रकरणाची माहिती व परवानगी करीता आदेश काढून तशी माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी यांना कळविण्यात आली. त्यामुळे बोरगावासी तसेच शिवसेना कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
बोरगाव येथील शाळेच्या मैदान मजुरांद्वारे करणे होते. मात्र येथील सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी संगनमत करून या कामावर बोगस मजूर दाखवून यंत्राच्या सहायाने काम केले. येथील सुज्ञ नागरिकांनी हे प्रकरण उचलून २६ जानेवारी २०१६ चे ग्रामसभेत विषय घेवून या कामावर झालेल्या गैरप्रकार प्रकरणी झालेला खर्च नामंजुर करण्यात आला.
वारंवार पत्रव्यवहार करून चार सदस्यीय, तीन सदस्यीय समितीच्या माध्यमातून विभागीय चौकशी लावून १ लाख ४४ हजार ०४९ एवढी रक्कम या प्रकरणात दोषी असलेले तत्कालीन ग्रामसेविक, सरपंच व रोजगार सेवक यांचेकडून समप्रमाणात वसूल करण्यात यावे, असे २६ जानेवारी २०१६ चे ग्रामसभेत एकमताने ठराव घेण्यात आला. मात्र संबंधितांनी निघालेली रक्कमेचा भरणा न केल्याने वरिष्ठांकडे तक्रार करून पाठपुरावा करण्यात आला. मात्र वरिष्ठाकडूनही ठोस कार्यवाहीचे चिन्ह दिसत नसल्याने ६ जूनला शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला.
यापुढे प्रशासन नमले असून चार सदस्यीय समितीच्या अहवालानुसार ३२ हजार ९५० रूपये या प्रकरणात दोषी आढून आलेले तत्कालीन ग्रामसेविका सरपंचा व रोजगार सेवक यांचे कडून वसूल करण्याचे पत्र काढून तशी माहिती मार्गदर्शनाकरीता पाठविण्यात आले. मात्र या कार्यवाहीमध्ये तक्रारकर्ते यांचा समाधान न झाल्याने त्यांनी खंडविकास अधिकारी यांचे मार्फत विभागीय आयुक्त नागपूर यांचेकडे पुनश्च तक्रार पाठविल्याचे समजते.
निवेदन देतेवेळी शिवसेना पदाधिकारी कमलेश मेश्राम, देवानंद उके, प्यारेलाल पटले, दिनेश वासनिक, मुकेश धुर्वे, मनोज पटले, पवन निर्वाण, सचिन गजभिये, सिद्धार्थ धुर्वे, डेविड खोब्रागडे आदी कार्यकर्ते हजर होते. यापुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष आहे.