विकास फाऊंडेशनचे संस्थापक माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात हे आंदाेलन करण्यात आले. शेकडाे नागरिक हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर एकत्र झाले. त्यांनी महाआरती करून काेराेना संपू दे मंदिर जनतेसाठी खुले करण्याची शासनाला सद्बुद्धी दे अशी मागणी केली. यावेळी माे. तारीक कुरैशी, डाॅ. युवराज जमईवार, भाऊराव तुमसरे, डाॅ. शांताराम चाफले, अनिल जिभकाटे, ललीत शुक्ला, हरेंद्र रहांगडाले, राजेश पटले, संदीप ताले यांच्यासह शेकडाे नागरिक उपस्थित हाेते.
चांदपूर येथे हनुमान देवस्थान नैसर्गिक वातावरणात असून याठिकाणी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील शेकडाे भाविक दर्शनासाठी येतात. गत दीड वर्षापासून मंदिर भाविकांसाठी बंद आहे. आता भंडारा जिल्हा जवळपास काेराेनामुक्त झाला आहे. प्रशासनाच्यावतीने लावण्यात आलेले अनेक निर्बंध उठविण्यात आले. शासनाने तत्काळ मंदिर उघडण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली.