भंडारा : विधानसभा निवडणुकीचे निकाल येत असतांना महायुती आणि महाविकास आघाडीतील काटेही टक्कर तर एकतर्फी वळल्याचे दिसत आहे पण महाविकास आघाडीचे सरकार आले असते तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले गेलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मात्र भाजपच्या अविनाश ब्राह्मणकर यांच्याकडून काटेची टक्कर मिळत आहे.
भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदार संघातून नाना पटोले यांना दहाव्या फेरीअखेरीस अविनाश ब्राह्मणकर यांनी ४७४ मतांनी मागे टाकले आहे. नऊ फेरी होईस्तोवर नाना पाटोले यांना मोठी आघाडी घेणे शक्य झाले नाही आणि दहाव्या फेरीअखेरीस ब्राह्मणकर यांनी नाना पटोलेंना मागे टाकत काँग्रेस नेत्यांना घाम सोडला आहे. त्यामुळे साकोली मतदार संघातील निवडणूक सध्याच्या क्षणाला राज्याच्या निवडणुकीपेक्षाही अधिक चुरशीची झाली आहे. येणाऱ्या अठरा फेऱ्यांमध्ये ब्राह्मणकर आघाडी कायम ठेऊ शकतील कि नाना पुन्हा मुसंडी मारतील हे पाहण्यासारखं असणार आहे.