जवाहरनगर : कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवी महाविद्यालय जवाहरनगर पेट्रोलपंप व गृह अर्थशास्त्र असोसिएशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आभासी व्यासपीठावर राष्ट्रीय पोषण सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. अजयकुमार मोहबंसी हे होते. प्रमुख वक्ते सीनियर लेक्चरर इन फार्मसीचे प्रा. हेमंत कोटांगळे, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी काटोलचे कुसुमताई वानखेडे, डॉ. श्रीबाला देशपांडे, प्रा. डॉ. अनिता वंजारी प्रा. डॉ. साधना वाघाडे, प्रा. सुभाष गोंडाणे यांची उपस्थिती होती. प्रा. हेमंत कोटांगळे म्हणाले,पोषण आणि आरोग्यासाठी सौंदर्यप्रसाधने या विषयानुसार आहारात शुद्धता असावी. परंतु आजच्या काळात ती मिळणे कमी झाले. आपण घेतलेल्या आहारात पोषकतत्त्व असावे. संवेदनशील त्वचेची काळजी घेणे गरजेचं आहे. पाणी एक पोषकतत्त्व आहे.चुकीच्या आहारामुळे त्वचेचे नुकसान होते त्यासाठी ताजी फळे, हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे. प्राचार्य मोहबंसी म्हणाले, की, सुरुवातीपासूनच स्मार्ट आहार देणे अशी कार्यक्रमाची थीम आहे. त्यानुसार महाविद्यालय व असोसिएशनने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. लहान मुलांना दूध, ताजे पदार्थ घरीच बनवून द्यावे, मऊ पोत, प्रथिने आणि ओमेगा-३देणे आवश्यक आहे. प्रास्ताविक प्रा.डाॅ. साधना वाघाडे यांनी केले. संचालन प्रा. डॉ. अनिता वंजारी यांनी केले. आभार प्रा.सुभाष गोंडाणे यांनी मानले.
कला, वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:42 AM