खतांच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:37 AM2021-05-21T04:37:27+5:302021-05-21T04:37:27+5:30

देशामध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमती दररोज बेसुमार वाढत असून पेट्रोलने देशात शंभरी पार केली आहे. डिझेलच्या दरवाढीने सर्वच वस्तूच्या ...

NCP's statement against fertilizer price hike | खतांच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे निवेदन

खतांच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे निवेदन

googlenewsNext

देशामध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमती दररोज बेसुमार वाढत असून पेट्रोलने देशात शंभरी पार केली आहे. डिझेलच्या दरवाढीने सर्वच वस्तूच्या किमती वाढून महागाईने उच्चांक गाठला आहे. अशातच केंद्रातील सध्याच्या भाजप सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत बेसुमार वाढ करून देशातील शेतकऱ्यांना दुसरा मोठा धक्का देण्याचे काम केले आहे. अगोदरच अवकाळी पाऊस व लाॅकडाऊनमुळे शहरासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. यावर दुहेरी मार म्हणून केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या १०:२६:२६ ची किंमत प्रतिबॅग ६०० रुपयांनी तर डीएपीची किंमत प्रतिबॅग ७१५ रुपयांनी वाढविली असून इतरही खतांच्या व औषधांच्या किमतीतही मोठी वाढ केलेली आहे. त्यामुळे कोरोनाच्या महामारीत अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम सध्याच्या केंद्र सरकारने केले आहे. केंद्र सरकारच्या या शेतकरीविरोधी धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फ तीव्र शब्दांत निषेध करीत आहे. ही दरवाढ केंद्र सरकारने तातडीने रद्द करावी. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहाडी तालुकातर्फे संपूर्ण तालुक्यात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोहाडी तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे, महिला तालुकाध्यक्ष रीता हलमारे, युवती तालुकाध्यक्ष तारा हेडाऊ, युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र मेहर, जिल्हा महासचिव विजय पारधी, मोहाडी राष्ट्रवादी पदाधिकारी खुशाल कोसरे, अनिल काळे, नरेश ईश्वरकर, आनंद मलेवार, प्रतिमा राखडे, मनीषा गायधणे, महादेव फुसे, संजय मते, राजेश ठाकरे, अनिता गजभिये, नत्थू माटे, गोपीचंद राखडे, पुरुषोत्तम पात्रे, मदन गडरीये, पठाण आदी उपस्थित होते.

===Photopath===

200521\img-20210520-wa0002.jpg

===Caption===

तहसीलदाराना निवेदन देताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी

Web Title: NCP's statement against fertilizer price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.