२७ लोक १२ के
पवनी : आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांच्या जीवनात अनेक मंगल घटना घडल्याने हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. भगवान बुद्धांनी याच दिवशी पाच परिवाज्रकांना धम्मदेसना दिल्यामुळे हा दिवस गुरू-शिष्यांची महती सांगणारा आहे. धम्मचक्र परिवर्तनाची ही खरी सुरुवात असून, खऱ्या अर्थाने हीच गुरूपौर्णिमा आहे. पाच परिवाज्रकांनी बुद्धांचा उपदेश धम्म प्रचार करण्यासाठी वापरला. ध्येय गाठण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे यातून सिद्ध होते, असे प्रतिपादन धम्मदूत भदंत संघरत्न माणके यांनी केले.
महासमाधीभूमी रुयाड येथील गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. धम्म समजून घेताना गुरू काय उपदेश करतात, याकडे मन आणि चित्त ठेवून ऐकले पाहिजे. यासाठी एकाग्रता ठेवणे महत्त्वाचे आहे. जे प्रवचन आपण ऐकतो, ते दुसऱ्यांना सांगण्याची क्षमता निर्माण होणे आवश्यक आहे. आयुष्यभर माणसाने शिष्य बनून राहिल्यास ध्येय सिद्धीपर्यंत पोहोचता येईल, असे मार्गदर्शन केले. आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनात घडलेल्या मंगल घटनांची माहिती उपस्थित उपासक-उपसिकांना भदंत माणके यांनी देऊन आषाढ पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीत बौद्ध भिक्खूंनी विहारात वर्षावास करताना उपस्थितांना धम्म उपदेश करावा. अनेक समाजहितैशी विषयांवर प्रबोधन करावे, असेही धम्मदूत संघरत्न माणके यांनी सांगितले. भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी धम्मदूत भदंत संघरत्न माणके यांनी उपस्थितांना धम्मादेशना दिली. पहिल्या टप्प्यात गुरूपौर्णिमेचा तर दुसऱ्या टप्प्यात स्मृतिशेष शिलमंजू शिंव्हगडे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
पय्या मेत्ता संघाद्वारे महासमाधीभूमी रुयाड येथे आयोजित दोन्ही कार्यक्रमांप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, महेंद्र गोस्वामी, अरुण गोंडाणे, आनंदविलास रामटेके, इंजि. जगदीश खोब्रागडे, इंजि. रूपचंद रामटेके, अरविंद धारगावे, भक्तराज गजभिये, देवा वानखेडे, मनोहर मेश्राम, स्वप्नील बन्सोड, विक्की कोल्हे, युवराज सुखदेवे, लोमेश सूर्यवंशी, सदानंद धारगावे, राजाराम गणवीर, धम्मानंद मेश्राम, वत्सला शिंव्हगडे, रंजू शिंव्हगडे, विपीन शिंव्हगडे, रिया शिंव्हगडे, छाया शिंव्हगडे, विनोद शिंव्हगडे, मनीषा शिंव्हगडे, सम्यक शिंव्हगडे, मनोज मोटघरे, सरिता मोटघरे आदी उपासक-उपासिका उपस्थित होते. संचालन धम्मानंद मेश्राम व अरुण गोंडाणे यांनी केले.