तुमसरचा नवीन सिमेंट रस्ता बनला पार्र्किं ग झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:48 PM2018-11-13T23:48:15+5:302018-11-13T23:48:50+5:30
शहरातील नवीन सिमेंट रस्ता आता वाहनांसाठी पार्र्किंग झोन झाला आहे. आंतरराजीय या सिमेंट रस्त्यावर मन मानेल त्या पध्दतीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंढी होवून अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शहरातील नवीन सिमेंट रस्ता आता वाहनांसाठी पार्र्किंग झोन झाला आहे. आंतरराजीय या सिमेंट रस्त्यावर मन मानेल त्या पध्दतीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंढी होवून अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
तुमसर शहरातील श्रीराम नगरातून जाणारा आंतरराज्यीय रस्ता आणि भंडारा मार्गावर सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे. एका बाजुला रस्ता पूर्णत्वाचा मार्गावर आहे. सदर सिमेंट रस्ता सध्या चारचाकी वाहनांचे पार्र्किंग स्थळ झाले आहे. थेट रस्त्यावर वाहने उभी केली जात आहे. एकेरी मार्गावर वाहतूक कोंढी होवू नये म्हणून येथे तात्पूरती वाहतूक सिमेंट रस्त्यावर करण्यात आली आहे. रेल्वे फाटकापासून गभने सभागृहापर्यंत ८०० मिटर लांबीचा दुहेरी मार्गाचे सिमेंटीकरण सुरु आहे. सुमारे चार कोटी किंमतीचा हा मुख्य रस्ता आहे. येथे डाव्या बाजूचे सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
उजव्या बाजूच्या रस्त्यावर वाहतूक कोंढी होवून नये म्हणून डाव्या बाजूचा सिमेंट रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. या नविन सिमेंट रस्त्यावर चारचाकी वाहने सर्रास उभी केली जात आहे. दूचाकी व चारचाकी हलक्या वाहनांकरिता मोकळा केला होता. त्याचा फायदा वाहने उभी करण्यासाठी होत आहे. त्यामुळे दुसऱ्या एकेरी मार्गावर वाहतूकीची कोंढी होत आहे.
येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. वाहतुक नियंत्रक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. शहरात अधिकारी वर्ग वास्तव्याला राहतो. याच मार्गाने त्यांचे ये-जा सुरु आहे. परंतु कुणीही दखल घेत नाही. दिवाळीत या रस्त्यावर प्रचंड गर्दी होती.
शहरात प्रवेश करणारा हा मुख्य रस्ता आहे. आंतरराज्यीय कटंगी, शिवनी रस्ता येथूनच जातो. जड ट्रक याच मार्गाने धावतात. सिमेंट रस्ता बांधकामामुळे एका पर्यायी रस्त्यावर वाहनाची मोठी गर्दी होते. अर्धे तुमसर शहर याच मार्गावर वसले आहे.
एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वाहने सध्या सिमेंट रस्त्यावर पार्र्किं ग केले जात आहे. नगर परिषदच्या जलवाहिनीचे काम सध्या सुरु आहे. तांत्रिक कारणामुळे सिमेंट रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही.
सिमेंट रस्त्याचे काम बंद
सिमेंट रस्त्याचे कामे सध्या बंद आहेत. दोन तीन दिवसांपूर्वी कामे सुरु होणार होती. पंरतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. येथे नवीन अभियंते रुजू झाले आहे. सदर रस्ता मोहाडी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतो. या सर्व प्रकारामुळे अपघाताची शक्यता वाढली असून प्रवाशांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.