याप्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक उमेश रायपूरकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुखराम वलके, उपसरपंच निकेश शहारे, शरदकुमार देवाडे, जगदीश पाटील, राजू झोडे, वैशाली कापगते, कांता सतीबावणे, विशाखा अलोने, विनोद कापगते, किरण रायपूरकर आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत व गावातील शाळा यांचा नेहमी समन्वय असला तर शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास मदत होते, असे विचार मुख्याध्यापक उमेश रायपूरकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. रामरतन वासनिक यांनी प्रास्ताविक केले. कांबळे यांनी संचालन केले. नीलेश जटाल यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी नितीन रायपूरकर, शरद तलमले, राहुल राऊत, सरजू रायपूरकर, विकास जांभुळे इत्यादींनी सहकार्य केले.