नवीन इमारत बांधकामासाठी साडेनऊ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:37 AM2021-05-21T04:37:25+5:302021-05-21T04:37:25+5:30

लाखांदूर येथे पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. या इमारतीचे मागील काही वर्षांत अनेकदा दुरुस्ती कामेदेखील करण्यात आली ...

Nine and a half crore fund sanctioned for construction of new building | नवीन इमारत बांधकामासाठी साडेनऊ कोटींचा निधी मंजूर

नवीन इमारत बांधकामासाठी साडेनऊ कोटींचा निधी मंजूर

Next

लाखांदूर येथे पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. या इमारतीचे मागील काही वर्षांत अनेकदा दुरुस्ती कामेदेखील करण्यात आली आहेत. मात्र, इमारतीस तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ लोटला असल्याने ही इमारत पूर्णत: जीर्ण व मोडकळीस आली आहे.

या परिस्थितीत या इमारतीत पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी प्रशासकीय कामे करीत असल्याने भविष्यात इमारतीच्या जीर्णावस्थेमुळे मोठा धोका होण्याची शक्यता नागरिकांत व्यक्त केली जात होती. हा धोका लक्षात घेता गत काही वर्षांपासून स्थानिक पंचायत समिती पदाधिकाऱ्यांंसह तालुक्यातील नागरिकांनी पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकामाची शासनाकडे मागणी लावून धरली होती.

या मागणीची दखल घेत साकोलीचे आमदार तथा महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढाकारात ग्रामविकास विभागाने गत २० एप्रिल रोजी पंचायत समितीच्या इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देऊन सुमारे ९ कोटी ५४ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या मंजुरीअंतर्गत स्थानिक लाखांदूर येथील पंचायत समिती परिसरातील गट क्रमांक २६७ मध्ये ९९५.८१ चौ.मी. जागेत बांधकाम केले जाणार आहे.

गत काही महिन्यांत स्थानिक लाखांदुरात राज्य शासनाकडून मंजूर विविध विकासकामांच्या मंजुरीवरून स्थानिक राजकीय पक्षात श्रेयवादावरून चढाओढ केली जात असल्याचे चित्र होते. मात्र, पंचायत समिती इमारत बांधकामाच्या मंजुरीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुुढाकारासंबंधाने प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आल्याने सध्या तरी अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या श्रेयवादाला पूर्णविराम मिळाला आहे.

===Photopath===

200521\img20210520140601.jpg

===Caption===

लाखांदुर येथील पंचायत समितीची जुनी ईमारत

Web Title: Nine and a half crore fund sanctioned for construction of new building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.