ग्राम ग्रामपंचायतच्या दर्जा असलेल्या साकोली शहराला २०१६ मध्ये नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त झाला. यानंतर, झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आली. यावेळी पहिल्या मुख्याधिकारी म्हणून तत्कालीन तहसीलदार हंसा मोहणे यांनी काही दिवस प्रभार सांभाळला. यानंतर, काही नियमित मुख्याधिकारी आले, परंतु त्यांची नियुक्ती काही दिवसांतच राहिली पुन्हा मुख्याधिकाऱ्यांच्या प्रभात तहसीलदार दुसऱ्या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला. मागील पाच वर्षांत लागोपाठ मुख्याधिकारी बदलत गेल्याने, साकोली शहराच्या अपेक्षित विकास होऊ शकला नाही.
साकोली नगरपरिषद मुख्याधिकारी का टिकत नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत. काहींच्या मते नगरसेवकांच्या अंतर्गत राजकारणामुळे मुख्याधिकारी आपले काम नीट करू शकत नाहीत. त्यांच्या कामात व्यत्यय येत असतो, तर याच कारणामुळे अनेक मुख्याधिकारी या नगरपरिषदेमध्ये येण्यास उत्सुक नसतात आणि आलेच तर लवकरात लवकर आपली बदली करण्याच्या प्रयत्नात असतात.
बॉक्स
नवे मुख्याधिकारी आलेले पदभार न स्वीकारता गेले
सध्या साकोली नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या प्रभार लाखांदूर नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्याकडे आहे. तीन दिवसांपूर्वी साकोलीचे नवे मुख्याध्यापकारी म्हणून कुलभूषण रामटेके हे पदभार घेण्यासाठी आले. त्यांच्यासोबत प्रभारी मुख्याधिकारी कावळे उपस्थित होते, परंतु रामटेके यांनी पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आता कुलभूषण रामटेके आपला पदभार स्वीकारतात की नाही, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
माधुरी मडावी यांनी गाजवली कारकीर्द
नगरपरिषदेत नियमित मुख्याधिकारी म्हणून माधुरी मडावी रुजू झाल्या होत्या. धाडसी निर्णयामुळे त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. त्यांनी शहरात उल्लेखनीय कार्य केले. त्यांची वर्धा येथे बदली झाल्यानंतर त्यांनी मॅटमध्ये स्थगिती मिळवली. त्यानंतर, त्या पुन्हा साकोली येथे रुजू झाल्या. त्यांच्या बदलीनंतर येथे प्रभारी मुख्याधिकारी काम पाहत आहेत. मात्र, मडावी यांची कारकीर्द खरोखरच उल्लेखनीय राहिली.