ग्रामसेवक युनियनचे असहकार आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:38 AM2021-08-26T04:38:03+5:302021-08-26T04:38:03+5:30

ग्रामसेवक संवर्गावर एकतर्फी कार्यवाही करणे, ग्रामसेवक श्रीवास्तव महागाव यांचे केलेले निलंबन मागे घेण्यात यावे, पदोन्नती प्रकरणे त्वरित निकाली काढणे, ...

Non-cooperation movement of Gramsevak Union continues | ग्रामसेवक युनियनचे असहकार आंदोलन सुरूच

ग्रामसेवक युनियनचे असहकार आंदोलन सुरूच

Next

ग्रामसेवक संवर्गावर एकतर्फी कार्यवाही करणे, ग्रामसेवक श्रीवास्तव महागाव यांचे केलेले निलंबन मागे घेण्यात यावे, पदोन्नती प्रकरणे त्वरित निकाली काढणे, कोरोनाने मृत्यू पावलेल्या ग्रामसेवकांचे प्रस्ताव शासनास पाठविणे, स्थायी कर्मचारी प्रकरणे निकाली काढणे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

शासन, प्रशासनाने या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर ३० ऑगस्टपासून ग्रामपंचायत अभिलेख बंद करून चावी, शिक्के गटविकास अधिकारी यांना सुपूर्द करून बेमुदत साखळी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. ग्रामसेवकाच्या आंदोलनामुळे ग्रामीण जनतेला दाखले मिळत नसल्यामुळे विविध योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

ग्रामीण विकासकामांनासुद्धा फटका बसत आहे. पं.स.देवरी येथे ठिय्या आंदोलनात तालुका अध्यक्ष नरेंद्र राठोड, उपाध्यक्ष गणेश मुनिश्वर, सचिव विलास गोबाडे, मुंडे, आशिष कावळे, वाय. एस. मानापुरे, एस. ए. मेश्राम, वाघमारे, खोटेले, मेश्राम, कैलुके, शिवणकर सहभागी झाले आहेत.

Web Title: Non-cooperation movement of Gramsevak Union continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.