एक लाख ६५ हजार मतदारांनी बजावला हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:30 AM2021-01-17T04:30:58+5:302021-01-17T04:30:58+5:30

मतदान उत्साहात आणि शांततेत पार पडले. जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडली नाही. आता सर्वांच्या नजरा सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले ...

One lakh 65 thousand voters exercised their right | एक लाख ६५ हजार मतदारांनी बजावला हक्क

एक लाख ६५ हजार मतदारांनी बजावला हक्क

Next

मतदान उत्साहात आणि शांततेत पार पडले. जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडली नाही. आता सर्वांच्या नजरा सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. २,७४५ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.

बॉक्स

असे झाले मतदान

तालुका मतदार मतदान टक्केवारी

तुमसर २७०२६ २२११४ ८१.८२

मोहाडी २५११२ २२३२६ ८८.९१

भंडारा ५३४७७ ४३४५८ ८१.२६

पवनी ३०४६५ २३९५९ ७८.६४

साकोली २०९२७ १८०२१ ८६.११

लाखनी २४५०८ २०६५९ ८४.२९

लाखांदूर १८१०२ १५०३९ ८३.०८

एकूण ९९९६१७ १६५५७५ ८२.९५

बॉक्स

महिलांची टक्केवारी ८२.११ टक्के

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानात महिलांनी हिरीरीने भाग घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ९८ हजार ६१० महिला मतदार असून, त्यापैकी ८० हजार ९६६ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ८२.११ टक्के महिलांनी मतदान केले. विशेष म्हणजे पुरुषांचे मतदान ८३.७७ टक्के आहे. पुरुषांपेक्षा महिलांच्या मतदानाची टक्केवारी केवळ एकने कमी आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी मतदान केल्याचे दिसून येत आहे.

Web Title: One lakh 65 thousand voters exercised their right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.