शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
2
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
3
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
4
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
5
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
6
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
7
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
8
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
9
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
10
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
11
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
12
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
13
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
14
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
15
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
16
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
17
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
18
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
19
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
20
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  

राजकीय वरदहस्तामुळेच भंडाऱ्यात वन-वे नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:35 AM

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : वाढत्या लोकसंख्येनुसार भंडारा शहरातील वाहनांची संख्याही वाढल्याने वाहतुकीच्या समस्या गंभीर होत आहेत. त्यातच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : वाढत्या लोकसंख्येनुसार भंडारा शहरातील वाहनांची संख्याही वाढल्याने वाहतुकीच्या समस्या गंभीर होत आहेत. त्यातच राजकीय वरदहस्तामुळे भंडारा शहरातील वन-वे गत काही वर्षांपासून नावालाच उरले आहेत. भंडारा शहरात याच मार्गावर आठवड्यातून दोन दिवस आठवडा बाजार भरतो. त्यामुळे बुधवारी आणि रविवारी येथे नागरिकांची मोठी गर्दी असते. यासोबतच इतरही दिवशी विविध खरेदीसाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. या मार्गावर असलेल्या अतिक्रमण व फेरीवाल्यांच्या हातगाड्या आणि दुकानांसमोर अस्ताव्यस्त लागलेली वाहने यामुळे या एकदिशा (वन-वे) मार्गावर अनेकदा वाहनधारकांची कसरत होते. मात्र, या सर्व घटना राजकीय वरदहस्तामुळेच होत असून, गेल्या काही वर्षात या मार्गांचे चित्र बदलले नसल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे.

भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या पंधरा लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांची संख्याही वाढली आहे. त्या तुलनेत शहरातील प्रमुख रस्त्यांनी मोकळा श्वास घेणे अपेक्षित होते. मात्र, भंडारा शहरातील बडा बाजार परिसर, गांधी चौक, नगर परिषद कार्यालय, राजीव गांधी चौक, जिल्हा परिषद चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणी पार्किंगची कुठेही व्यवस्था नाही. त्यामुळे अनेकजण विविध कामांसाठी थांबताना वाटेल तशी वाहने उभी करतात. याचा नाहक त्रास दररोज वाहतूक पोलिसांनाही होतो. बेशिस्त वाहनधारक आपल्या मनमर्जीने वागतात. मात्र, याचा रोष इतर नागरिकांसह वाहतूक पोलिसांना पत्करावा लागतो. शहरातील पोस्ट ऑफिस चौक ते गांधी चौक परिसरापर्यंतचा मार्ग हा एकदिशा आहे. या एकदिशा मार्गावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरूच आहे. यामध्ये अनेक वाहनधारकांकडून दंडही वसूल केला जात आहे. मात्र, त्यातही काही अरेरावी करणारे वाहनधारक व राजकीय वरदहस्तामुळे पोलिसांना काहीवेळा कारवाई करताना मर्यादा येतात. मात्र, याचा त्रास सर्वसामान्यांनाच सहन करावा लागतो. भंडारा शहरातील बडा बाजार मार्गावर कापड दुकाने, औषध, सोने-चांदी सराफांची दुकाने, भाजीपाला, पोलीस स्थानक, नगर परिषद, पोस्ट ऑफिस कार्यालय यासह अन्य विविध महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा सुरू असते. शहरातील अरुंद रस्त्यावर नगर परिषदेने अद्यापही कोणता मास्टर प्लान तयार केला नसल्याने कित्येक वर्ष जुन्या अरुंद रस्त्यावरूनच वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत वाहनांची वाढलेली लक्षणीय संख्या विचारात घेता, शहरातील प्रमुख रस्ते अपुरे पडत आहेत. यासोबतच शहरात काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याची गरज आहे. बाजारात खरेदीसाठी आलेले नागरिकही बडा बाजार मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे अनधिकृत पार्किंग करत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होते.

बॉक्स

वाहतूक पोलिसांशीही घालतात हुज्जत

बडा बाजार मार्गावरून अनेकदा वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस वाहनधारकांना अस्ताव्यस्त वाहने उभी करू नका, म्हणून विनंती करतात. मात्र, अनेक वाहनचालक वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालतात. काहीवेळा राजकीय मंडळींनाही फोन लावले जातात. त्यामुळे अनेकदा कारवाईत अडथळा येतो, मात्र यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.

बॉक्स

दुकानांसमोरच केली जाते पार्किंग

भंडारा शहरात बडा बाजार मार्गावर वाहतुकीची समस्या गंभीर आहे. अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे अनेक ठिकाणी दुकानांसमोर रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग केली जातात. नगर परिषद कार्यालयासमोर तर वाहने लावायलाच जागा राहात नाही. अशावेळी रस्त्यावरच पार्किंग केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीला वारंवार अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक पोलीस अनेकदा अनधिकृत वाहने पार्क करणाऱ्यांवर कारवाई करतात. मात्र, तरीही वाहतूक नियमनासाठी नागरिकांचे अपेक्षित सहकार्य पोलिसांना मिळत नाही.

बॉक्स

वाहतूक नियमनासाठी फिरते पथक कार्यरत

भंडारा शहरातील एकदिशा मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोस्ट ऑफिस चौकात दोन वाहतूक पोलीस तर गांधी चौकात दोन पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यासोबतच वाहतूक पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्यासह पथक नेहमीच फिरत असते. अनेकदा स्वतः मुख्याधिकारी विनोद जाधव व पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी व्यापारी असोसिएशनची बैठक घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

कोट

भंडारा शहरात वाहतूक नियमनासाठी त्रिमूर्ती चौक, जिल्हा परिषद चौक, पोस्ट ऑफिस चौक, गांधी चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेता, नगर परिषद व वाहतूक पोलिसांच्या मदतीने एकदिशा मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

- शिवाजी कदम,

वाहतूक पोलीस निरीक्षक, भंडारा