जिल्ह्यात चार लघु प्रकल्प आहेत. त्यामध्ये ३६.६५ टक्के जलसाठा असून चांदपूर प्रकल्पात ४४.२७ टक्के, बघेडा २८.३५ टक्के, बेटेकर बोथली २९.४० टक्के आणि सोरना प्रकल्पात ९.५० टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पात १५.६९५ दलघमी उपयुक्त साठा असून १.५३ दलघमी मृत साठा आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून या सर्व प्रकल्पाची क्षमता ५३.५४१ दलघमी आहे. सध्या या प्रकल्पात १७.२८६ दलघमी उपयुक्त साठा असून ४.२४८ दलघमी मृतसाठा आहे. तुमसर तालुक्यातील कवलेवाडा, भंडारा तालुक्यातील आमगाव, सिल्ली आंबाडी, पवनी तालुक्यातील वाडी, भिवखिडकी या प्रकल्पांमध्ये तूर्तास ५० टक्केपेक्षा अधिक जलसाठा आहे.
जिल्ह्यात माजी मालगुजारी अर्थात मामा तलावांची संख्या २८ आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता २५.४०४ दलघमी असून सध्या या प्रकल्पात केवळ ७.२५४ दलघमी जलसाठा आहे. प्रत्येक गावात मामा तलाव असले तरी २८ तलाव जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहेत. या तलावांची अवस्था बिकट झाली असून साठवणूक क्षमता गारामुळे कमी होत आहे.
बॉक्स
मुबलक पाऊस तरीही प्रकल्प तळाला
भंडारा जिल्ह्यात पावसाळ्यात मुबलक पाऊस झाला. अतिवृष्टी आणि महापुराने हाहाकार उडाला होता. असे असतानाही जिल्ह्यातील प्रकल्पांनी आता तळ गाठला आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला प्रकल्प तुडुंब भरले होते. मात्र आता या प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट दिसत आहे. यामागच्या कारणाचा शोध घेतले असता अनेक प्रकल्पात गाळ साचला आहे. प्रकल्पाची साठवण क्षमता कमी होत आहे. तसेच सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने जलसाठा खालावत आहे.