विरोधी पक्षनेत्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:37 AM2021-05-27T04:37:28+5:302021-05-27T04:37:28+5:30

भंडारा : जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारांच्या वर्षावासह आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. असे असताना शासन-प्रशासन याविषयी गंभीर ...

Opposition leaders know the problems of the affected farmers | विरोधी पक्षनेत्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या

विरोधी पक्षनेत्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या

Next

भंडारा : जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारांच्या वर्षावासह आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. असे असताना शासन-प्रशासन याविषयी गंभीर नाही. आघाडी शासन राजकारण करण्यात मश्गूल आहे. शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर केले.

यावेळी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, खासदार सुनील मेंढे, आमदार परिणय फुके, सामाजिक कार्यकर्ते बालू मस्के, आल्हाद भांडारकर, भुमेश ढेंगे, किशोर वाघाये, अश्विन सार्वे, संदीप भांडारकर आदी उपस्थित होते. देवेेंद्र फडणवीस यांनी खुटसावरी येथील धनंजय वाहाणे, दादाभाई वाहाणे यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली. यावेळी उमराव मस्के, शेषराव शेंडे, बाबूराव मस्के, सत्यवान पेशने, रवींद्र वासनिक, अरुण मांढरे, राजेश सार्वे, धनसिंग रामटेके यांच्याशी समस्यांविषयी चर्चा केली. यावेळी जवळपास ५० शेतकरी उपस्थित होते.

बॉक्स

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन

यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी समस्यांचे निवेदन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोपविले. निवेदनात खुटसावरी व पिंपळगाव येथे स्मशान शेड व सभामंडप जनसुविधेंतर्गत मंजूर करण्यात यावे, अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावे, खुटसावरी गावाला जागेचा अभाव असल्याने अनेक शासकीय योजना परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे खुटसावरीच्या इंदिरानगरलगत असलेल्या रिठी गाव चिखली हमेशा येथील राखीव जागा खुटसावरीला हस्तांतरण करण्यात यावी, राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ साठी इमारत बांधकाम करण्यात यावे, यासह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, आदी मागण्यांचा समावेश होता. यावेळी सरपंच मनीषा वासनिक, उपसरपंच संदीप खंडाते, सदस्य ज्योती नंदेश्वर, प्रियंका सार्वे, वृषाली शहारे, संगीता बोरकर, राकेश शेंडे, विनोद पोटवार, रुस्तम टेंभुर्णे आदी उपस्थित होते.

Web Title: Opposition leaders know the problems of the affected farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.