आॅनलाईन लोकमतभंडारा : आंतरजिल्हा बदली होऊन भंडारा जिल्हा परिषदमध्ये रुजू झालेल्या शिक्षकांच्या समस्या व नियमित शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तात्काळ निकाली काढाव्या, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी व आमदार यांना निवेदन देण्यात आले.अखिल महाराष्टÑ प्राथमिक शिक्षक संघ व भंडारा जिल्हा परिषद माध्य., उच्च माध्य., शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने यासाठी पुढाकार घेतला.अखिल महा. प्राथ. शिक्षक संघअखिल महाराष्टÑ प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर दमाहे, राज्य पदाधिकारी जे.एम. पटेल, तालुका अध्यक्ष रवी उगलमुगले, तालुका उपाध्यक्ष नेपाल तुरकर, तालुका सरचिटणीस नरेंद्र रामटेके, मोहाडी तालुका अध्यक्ष किशोर ईश्वरकर, आंतरजिल्हा बदली प्रतिनिधी विनय धुमनखेडे, संजय झंझाड यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डोंगरे यांनी प्रलंबित समस्या तात्काळ सोडवून निकाली काढण्याचे आश्वासन दिले.जि.प. माध्य. शिक्षक संघटनाजिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष ओ. बी. गायधने शिक्षकनेते श्याम ठवरे, रवी मेश्राम, प्रकाश करणकोटे, डब्ल्यू आर. गजभे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी व आमदार चरण वाघमारे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी कार्यवाह संदीप वहिले, एच.एन. शहारे, विजय हटवार, गोपाल राठोड, शरद वाघमारे, जि.एल. क्षिरसागर, गोपाल लांजेवार, बाळू चव्हाण, सी. जी. गिरीपुंजे, डी. डी. नवखरे, पी. एन. गोपाले, जे. बी. गायधने, मुकूंदा ठवकर, डी. आर. हटवार, नामदेव साठवणे, कलीम शेख, मदन मेश्राम, पी. आर. पवार, एन. एल. गडदे, जी.एस. काळे, संदीप आळे, पी. एस. भोयर, आर. जी. रंदये, सुनिता गायधने, अनिता काजारखाणे, सुनिल सोनुले आदी उपस्थित होते.या आहेत मागण्याआंतरजिल्हा बदलीसाठी राज्यस्तरावर आॅनलाईन पोर्टल सुरु करावे, २०१५ च्या शासन अध्यादेशानुसार बदल्या कराव्या, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांना पदोन्नती द्यावी, ग्रेट पे मधील तफावत दुर करावी, प्रवास भत्त्याकरिता आनलाईन तरतुद करावी, संचमान्यता दुरुस्त करुन समायोजन करावे, सेवाज्येष्ठता यादी प्रकाशित करावी, अंशकालीन निदेशक व घडाळी ताशीका शिक्षकांचे थकीत मानधन दयावे, डीसीपीएसची रक्कम जीपीएफला जमा करुन पावती द्यावी, शिक्षकांचे थकीत दोन महिन्याचे वेतन द्यावे, शिक्षकांना वार्षिक वेतन वाढ द्यावी, कार्यमुक्तीच्या दिवशी रुजू करावे, ९ मे २०१७ पासून सेवापुस्तीकेत नोंद घ्यावी आदींचा समावेश आहे.
शिक्षकांच्या समस्यांसाठी संघटनांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:52 PM
आंतरजिल्हा बदली होऊन भंडारा जिल्हा परिषदमध्ये रुजू झालेल्या शिक्षकांच्या समस्या व नियमित शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तात्काळ निकाली काढाव्या, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी व आमदार यांना निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देआंतरजिल्हा बदली प्रकरण : अखिल महा. प्राथ. शिक्षक संघ, भंडारा जि.प. माध्य. शिक्षक संघटनेची मागणी