शासकीय जागवर नियमबाह्य मुरुम खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 09:27 PM2019-03-19T21:27:29+5:302019-03-19T21:27:59+5:30

शासकीय जागेतून नियमबाह्य आणि यंत्राच्या सहाय्याने मुरुम खनन होत असल्याचा प्रकार तालुक्यातील तुमसर शिवारात सुरु आहे. महसूल प्रशासन निवडणूक कामात व्यस्त असल्याने याकडे कुणाचेही लक्ष नाही.

Out-of-Government Rule Mining | शासकीय जागवर नियमबाह्य मुरुम खनन

शासकीय जागवर नियमबाह्य मुरुम खनन

googlenewsNext
ठळक मुद्देरूपेरा येथील प्रकार : महसूल प्रशासन निवडणूक कामात व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शासकीय जागेतून नियमबाह्य आणि यंत्राच्या सहाय्याने मुरुम खनन होत असल्याचा प्रकार तालुक्यातील तुमसर शिवारात सुरु आहे. महसूल प्रशासन निवडणूक कामात व्यस्त असल्याने याकडे कुणाचेही लक्ष नाही.
रुपेरा गावशिवारात शासकीय दस्ताऐवज नोंदीनुसार ढोरफोडी भूमापन क्रमांक ४२३ साझा क्रमांक १६ येथे निश्चित करण्यात आली आहे. सुमारे अडीच एकर शासकीय जागा आहे. सदर परिसरातून यंत्राने नियमबाह्य मुरुम उत्खनन केले जात आहे. मुरुमाची लिज नसताना व्यवसायीक कामासाठी त्याचा वापर होत आहे. सदर जागेच्या बाजूला खासगी शेत असतानाही मुरुमाचे उत्खनन होत आहे. या परिसरात मुरुमाचा मुबलक साठा आहे. रस्त्याच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. दिवसाढवळ्या जेसीबीद्वारे उत्खनन केले जात आहे. शासकीय जागेतून मुरुम उत्खनन सुरु असताना स्थानिक महसूल विभागाचे कर्मचारी मात्र येथे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. परिसर पोखरला जात असून शासनाचा लाखोंचा महसूलही बुडत आहे. कुणीच या प्रकाराबाबत विचारणा करायला तयार नाही. निवडणूक कामात प्रशासन व्यस्त आहे तर दुसरीकडे गौण खनिजाची राजरोस तस्करी सुरु आहे. या प्रकाराबाबत संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे या उत्खननामुळे लगतच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आहे.

Web Title: Out-of-Government Rule Mining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.