आॅनलाईन लोकमतभंडारा : शिक्षकांच्या निवड श्रेणीचे २२१ प्रकरण निकाली काढण्यात आले. या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सोमवारला मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी समस्या सोडविल्याने शिक्षकांमध्ये उत्साह संचारला आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने सोमवारला मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी मुबारक सैय्यद यांनी त्यांना, माहे जानेवारी २०१८ च्या शिक्षकांच्या वेतनाविषयी चर्चा केली. वेतनाचा हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सुर्यवंशी यांनी दिले.वेतनासोबतच मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या निवड श्रेणी प्रकरणांचा मुद्दा उपस्थित केला. यावर सीईओंनी यावेळी प्राथमिक शिक्षकांची १७४ प्रकरण, माध्यमिक शिक्षकांची १३ प्रकरण, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची तीन प्रकरणे आणि प्रयोगशाळा सहायकांची तीन प्रकरण, वरिष्ठ श्रेणीची सहायक शिक्षकांची १९ प्रकरणे व पदविधर शिक्षकांची नऊ असे २२१ प्रकरणे मंजूर करण्यात आली. सोबतच आंतरजिल्हा बदली शिक्षकांच्या दोन महिन्यांचे वेतन, वेतनवाढ व सेवा सातत्याबाबत चर्चा केली. यावेळी शिक्षणाधिकारी(माध्य) मेंढेकर, शिक्षणाधिकारी मोहन चोले, कुलसुंगे व संघाचे देवानंद घरत, शैलेश खेताडे, संजीव बावनकर, सुधीर वाघमारे, रमेश काटेखाये, मुकेश मेश्राम, महेश गावंडे, यामिनी गिरीपुंजे उमेश गायधने, देवानंद दुबे, सुरेंद उके, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
२२१ शिक्षकांच्या निवड श्रेणीचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 11:04 PM
शिक्षकांच्या निवड श्रेणीचे २२१ प्रकरण निकाली काढण्यात आले. या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सोमवारला मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्याशी चर्चा केली.
ठळक मुद्देसीईओंचा पुढाकार : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या चर्चेला यश