लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : आयुध निर्माणीचे निगमीकरण आणि संरक्षण उत्पादनाच्या खासगीकरणाविरोधात केंद्रीय ट्रेड युनियन आणि फेडरेशनने बुधवार ८ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात जवाहरनगर आयुध निर्माणीतील कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जवाहरनगर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे.केंद्र सरकारच्या औद्योगिक व आर्थिक धोरणाच्या विरोधात दोन वर्षापासून आंदोलन सुरु आहे. धरणे, रस्ता रोको, निदर्शने यासोबत पाच दिवसाचा संपही करण्यात आला होता. आता बुधवार ८ जानेवारी रोजी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली. विविध १६ मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. भंडारा आयुध निर्माणी प्रवेशद्वारासमोर इंटक, एम्प्लाईज रेड युनियन, डेमोक्रोटीक मजदूर युनियन आदींद्वारे संप पुकारण्यात आला आहे.या आहेत मागण्याआयुध निर्माणीचे निगमीकरण करू नये, संरक्षण उत्पादनाचे खासगीकरण करू नये, आठ तासाच्या वर दैनिक कामावर पाठवू नये, राष्ट्रीय पेंशन प्रणाली एनपीएस बंद करावी, सशस्त्र दलासोबत रक्षा नागरी कर्मचाऱ्यांना जुनी ठरवून दिलेली गॅरंटीकृत पेंशन योजना बहाल करावी, समान कामाचे समान वेतन निश्चित करावे या व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन आहे.
देशव्यापी संपात आयुध निर्माणी संघटनांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 6:00 AM
केंद्र सरकारच्या औद्योगिक व आर्थिक धोरणाच्या विरोधात दोन वर्षापासून आंदोलन सुरु आहे. धरणे, रस्ता रोको, निदर्शने यासोबत पाच दिवसाचा संपही करण्यात आला होता. आता बुधवार ८ जानेवारी रोजी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली. विविध १६ मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. भंडारा आयुध निर्माणी प्रवेशद्वारासमोर इंटक, एम्प्लाईज रेड युनियन, डेमोक्रोटीक मजदूर युनियन आदींद्वारे संप पुकारण्यात आला आहे.
ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा बंदोबस्त