प्रवाशांची गळक्या बसेसपासून झाली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:37 AM2021-08-23T04:37:51+5:302021-08-23T04:37:51+5:30
अशात प्रवाशांना मात्र गळक्या बसेसमधून प्रवास करावा लागत असून यामुळेच त्यांनी प्रवास त्रासदायक होतो. मात्र प्रवाशांचा प्रवास सुखद व्हावा ...
अशात प्रवाशांना मात्र गळक्या बसेसमधून प्रवास करावा लागत असून यामुळेच त्यांनी प्रवास त्रासदायक होतो. मात्र प्रवाशांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी प्रयत्नरत असलेल्या महामंडळाने गळक्या बसेसची त्वरीत दुरूस्ती करण्याचे आदेश दिले आहे.
त्यानुसार, भंडारा आगाराकडे असलेल्या गळक्या बसेसची दुरूस्ती उन्हाळ्यातच करण्यात आली असून आतापर्यंत तरी तक्रार आली नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊन काळ बसेसच्या दुरूस्तीसाठी उपयोगी पडला. त्यामुळे सर्व बसेस सुरळीतपणे सुरु आहेत.
बॉक्स
कार्यालयाकडे मेंटेनन्स
आगारातील बसेसचे मेंटेनन्स करण्यासाठी आगारातच वेगळा विभाग आहे. शिवाय, विभागीय कार्यालयाकडून सर्व साहित्य व गाड्यांचे पार्ट्स पाठविले जाते. त्यामुळे कुठलीच समस्या नाही.
कोट
आता एसटीने कात टाकली असून प्रवाशांच्या सोयीनुसार बदल केले जात आहेत. आगाराकडे गळक्या काही बसेस होत्या व त्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. लॉकडाऊनचा काळ दुरूस्तीसाठी लावला. - फाल्गुन राखडे
आगार प्रमुख, भंडारा
पूर्वी एसटीचा प्रवास म्हणताच धडकी भरत होती. मात्र आता एसटीने कात टाकली असून गळक्या बसेस व फाटक्या सीटांपासून सुटका झाली आहे. आता फक्त रस्त्यांमुळेच एसटीच्या प्रवासात दचके खावे लागत आहेत.
- संजय मिरासे
आताच्या एसटी पूर्वी सारख्या राहिलेल्या नाहीत. पूर्वी पाणी गळत असतानाही व फाटक्या सीटवर बसून जावे लागत होते. आता मात्र तशा एसटी दिसत नाही. महामंडळाने एसटीचा चेहरा-मोहरा बदलून टाकला असून प्रवाशांची सोय केली आहे.
- विवेक मोटघरे