भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शेतीची विविध कामे करण्यासाठी पांदण रस्त्यावरून अवागमन करावे लागते. परंतु सदर रस्त्यांचे अजूनपर्यंत खडीकरणासह डांबरीकरण करण्यात आले नसल्याने शेतावर बैलबंडी, ट्रॅक्टर कसे न्यावे, असा प्रश्न पडत आहे. यामुळे शेतकरी, शेतमजुरांना कमालीचा शारीरिक, मानसिक, भावनिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे. जिल्हा व तालुका प्रशासनाच्या अधीनस्त संबंधित यंत्रणेने भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पांदण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करून यासाठी निधी मंजूर करणे गरजेचे आहे.
शिष्टमंडळात भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, हर्षवर्धन हुमने, उमाकांत काणेकर, विनाश खोब्रागडे, नितीश काणेकर, मच्छिंद्र टेंभुर्णे, अरुण ठवरे, नरेंद्र कांबळे, शांताराम खोब्रागडे, धनराज तिरपुडे, बंडू फुलझेले, रतन मेश्राम, जयेंद्र मुल आदींचा समावेश होता.