१३ लोक २१ के
मोहन भोयर
तुमसर: परसवाडा शिवारात गट क्रमांक ३३३ येथे मुरुमाच्या खदानी होत्या. गट क्रमांक ३३२ येथे झुडपी जंगल आहे. परिसरात वीज कारखान्यातील राखेच्या वापर करणे सुरू आहे. ऊर्जा प्रकल्पातील राख त्यात भरली जात आहे. तुमसर भंडारा मार्गावर रस्त्यालगतच चारही बाजूंनी मातीची उंच पाळ तयार करण्यात आली आहे. या मार्गाने जाणाऱ्या- येणाऱ्यांचे लक्ष ही पाळ वेधून घेत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी याव र तीव्र असंतोष नोंदविला आहे.
तुमसर तालुक्यातील परसवाडा शिवारात गट क्रमांक ३३२ येथे झुडपी जंगल व गट क्रमांक ३३३ येथे मुरूम खदान याची नोंद आहे. त्यामुळे दोन्ही गट हे शासकीय गटात आहेत त्यापैकी ३३३ येथे मुरूम खदानी होत्या. त्यामुळे तेथे मोठे खड्डे पडले होते या खड्ड्यांना बनविण्याकरता वीज कारखान्यातील राखेचा वापर करण्यात आला त्याला लागूनच गट क्रमांक ३३३ आहे. हा गट झुडपी जंगलाच्या असल्याची माहिती असून तिथे खुरट्या वनस्पती होत्या. या दोन्ही गटात राखेच्या भराव करण्यात आला. त्याला समतल करण्यात सुरू आहे.
या संपूर्ण गटात चहूबाजूंनी मातीची पाळ तयार करण्यात आली आहे. रस्त्यावरून ये-जा करणा-या प्रवाशांना येथे तलाव असल्याचा भास होतो.
राख हवेत पसरण्याचा धोका: मोठ्या प्रमाणात राखेचा भराव करण्यात आल्याने परिसरातील शेतीमध्ये हवेमार्फत ती राख पसरण्याचा धोका अधिक वाढला आहे. वादळी व सुसाट वा-यामध्ये ही राख पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेती आहे त्यामुळे शेतीचे पीक या राखेमुळे धोक्यात येण्याची शक्यता अधिक आहे. राखेमुळे परिसरातील शेती नापीक होण्याचा धोका वाढला आहे. प्रशाशनाने येथे दखल घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. येथे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
सिंचनाची सुविधा बंद: परसवाडा शिवारात मुरमाच्या मोठ्या खदानी होत्या काही खदानी तर मिनी तलाव असल्यासारख्या होत्या. या खदानीत पावसाळ्यात मोठा पाणी साठा उपलब्ध व्हायचा शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा सिंचनासाठी व्हायचा बरीच शेती यामुळे ओलिताखाली येत होती.
आता राखेने खदानी बुजविल्यामुळे सिंचनाची सुविधा येथे बंद होणार आहे.
तुमसर भंडारा रस्त्याशेजारी मुरूम खदानी बुजविण्याचा प्रकार सुरू आहे येणाऱ्या-जाणाऱ्यांचे हे लक्ष वेधून घेत आहे. या मार्गाने लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी ये-जा करतात; परंतु त्यांचे लक्ष तिथे गेले नाही काय, हा एक मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. एखाद्याने पूजनाला शासन मान्यता देते काय, असाही प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. अन्य पर्याय उपलब्ध असताना राखेच्या भराव का करण्यात येत आहे, असा एक प्रश्न पडला आहे.