भंडारा तालुक्यातील खमाटा येथील प्रगतिशील शेतकरी अमीन पटेल यांच्या शेतावर सीड ड्रील पद्धतीने भात पेरणीचे प्रात्यक्षिक, तसेच पपईच्या चार एकरांतील फळबागेची पाहणी करताना ते बोलत होते. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पांढराबोडी, सिरसी येथील भाजीपाला उत्पादक, तसेच फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देत पाहणी केली. यावेळी त्यांनी फळबाग लागवडीचे मार्गदर्शन केले.
भेटीदरम्यान त्यांच्यासोबत भंडारा मंडळचे कृषी पर्यवेक्षक विजय हुमने, साकोली कृषी विज्ञान केंद्राचे योगेश महल्ले, कृषी सहायक रेणुका दराडे, पूजा म्हेत्रे, भंडारा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. खमाटा येथील शेतकरी अमीन पटेल यांच्या शेतावर भंडारा तालुका कृषी विभागातर्फे सिड ड्रीलने धान लागवडीचा प्रयोग राबविण्यात आला. पर्यवेक्षक विजय हुमणे यांनी फळबाग लागवडीचे फायदे, रोग-किडीबाबत मार्गदर्शन केले. कृषी सहायक रेणूका दराडे यांनी सिर्सी मुख्यालयातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने मल्चिंग ठिबकवर लागवड केलेल्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना भाजीपाला पिकांवर असणाऱ्या कीड रोगांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी सहायक पूजा म्हेत्रे यांनी अमीन पटेल यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. कृषी सहायक पूजा म्हेत्रे यांनी सूत्रसंचालन केले, तर कृषी सहायक रेणुका दराडे यांनी आभार मानले.
बॉक्स
जिल्ह्यात फळांची वर्षभर चांगली मागणी
कोरोना आल्यापासून जिल्ह्यातील ग्राहकांकडून फळांची मागणी वाढली आहे. फळे महागली असली तरी अनेकजण आरोग्यासाठी खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी, माती, बाजारपेठ या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन धान पिकाऐवजी फळबाग लागवड करून आपले अर्थकारण उंचावणे गरजेचे आहे. वर्षभर फळांची चांगली मागणी असून, फळांचे दरही चांगले आहेत. शिवाय फळबाग लागवड केल्यानंतरही शेतकऱ्यांना आंतरपिके घेता येत असल्याने शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड फायदेशीर ठरत आहे. फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाच्या विविध योजना लाभ घेण्याचे आवाहन अविनाश कोटांगले यांनी केले.