प्लास्टिकच्या पत्रावळी, द्रोण ठरताहेत धोकादायक
By admin | Published: July 4, 2015 01:26 AM2015-07-04T01:26:41+5:302015-07-04T01:26:41+5:30
सर्वत्र प्लास्टिकचा वापर वाढत चालला आहे. टाकाऊ प्लास्टिक हे मानवांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्याला घातक ठरत आहे.
भंडारा : सर्वत्र प्लास्टिकचा वापर वाढत चालला आहे. टाकाऊ प्लास्टिक हे मानवांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्याला घातक ठरत आहे. टाकाऊ प्लास्टिक जनावरे खात असल्याने कित्येक जनावरांचा मृत्यू होत आहे.
या प्रकारावर अंकुश लावण्याची मागणी केली जात आहे. घरांबाहेर किंवा रस्त्यावर खाता-खाता प्लास्टिकही जनावरांच्या पोटात जाते. यामुळे विविध विकार होऊन जनावरे दगावतात.
प्लास्टिकमुळे माणसांची सोय होत असली तरी जनावरांसाठी ते हानिकारक ठरत आहे. लग्नकार्यात प्लास्टिकच्या पत्रावळी, द्रोण, वाटी, चमचे आदींचा वापर मोठया प्रमाणात होऊ लागला आहे.
लग्नमंडपात सार्वजनिक सभागृहात, तथा मंगल कार्यालयात लग्नकार्य पार पडले की, लोक निघून जातात. उरलेले अन्न व प्लास्टिक पत्रावळींच्या ढिगाकडे जनावरे आकृष्ट होतात व त्यांना खावून मृत्युमुखी पडतात. याकडे प्रशासनाची लक्ष देण्याची गरज आहे (वार्ताहर)