अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कलाशिक्षक व ज्येष्ठ मार्गदर्शक दिनकर कालेजवार होते. यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य, पदाधिकारी पंकज भिवगडे व योगेश वंजारी उपस्थित होते.यावेळी ग्रीनफ्रेंड्स,अंनिस तसेच नेफडोचे जिल्हा कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी पर्यावरणस्नेही होळी साजरी कशी करावी याचे मार्गदर्शन केले. लाकडाची होळी तसेच रासायनिक रंगाचे दुष्परिणाम समजावून दिले. हे टाळण्याकरिता परिसर स्वच्छता करून केरकचरा होळीचे दहन करण्याचे आवाहन केले. रासायनिक रंगाच्या ऐवजी नैसर्गिक रंग घरच्याघरी जल व भुकटीच्या स्वरूपात तयार करून खेळा होळी इकोफ्रेंडलीचा संदेश याद्वारे त्यांनी दिला. कार्यक्रमअध्यक्ष दिनकर कालेजवार यांनी पारंपरिक सण हे कसे पर्यावरण स्नेही होते, हे सोदाहरण पटवून दिले. यानंतर लाखनी बसस्थानक वर परिसर स्वच्छता राबवून केरकचरा गोळा करण्यात आला. ग्रीनफ्रेंड्सच्या कार्यालयात केरकचरा होळी ,व्यसनी व अंमली पदार्थांची होळी असा फलक त्यावर लिहून वृक्षपूजन व केरकचरा पूजन प्रमुख अतिथीनी केले. त्यानंतर प्रतिकात्मक, संदेशयुक्त केरकचरा होळीचे ज्वलन करण्यात आले. यावेळी खेळा होळी इकोफ्रेंडली व पर्यावरणस्नेही असा उदघोष सर्वांनी केला. लाखनी बसस्थानकावर स्वयंस्फूर्तीने कार्य करणारे छविल रामटेके, अमर रामटेके, दीप रामटेके, प्रज्वल भांडारकर यांचा स्मृतिचिन्ह व पदक देऊन सत्कार करण्यात आला.
संचालन व प्रास्ताविक प्रा.अशोक गायधने, तर आभार प्रदर्शन अशोक वैद्य यांनी केले. कार्यक्रमाकरिता अजय प्रतापसिंह, नितेश नगरकर, छविल रामटेके, प्रज्वल भांडारकर, प्रिन्स शेंडे, हरिष सेलोकर, आर्यन धरमसारे, उन्नती देशमुख, दीप रामटेके, अमर रामटेके, आरु आगलावे, ओम आगलावे यांनी सहकार्य केले.
बॉक्स
स्पर्धेत अमर व दीप रामटेके अव्वल
यानिमित्ताने नैसर्गिक रंग बनवा स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत मिडलस्कुल गटात प्रथम क्रमांक अमर रामटेके याला तर द्वितीय क्रमांक छविल रामटेके तर तृतीय क्रमांक आर्यन धरमसारे याला तर प्रोत्साहनपर क्रमांक हरिष सेलोकर याला प्राप्त झाला .हायस्कुल गटात दीप रामटेके याला प्रथम ,कार्तिक सेलोकर याला व्दितीय क्रमांक तर प्रज्वल भांडारकर याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.