सांडेकर कुटुंबीयांनी गाठले पोलीस ठाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:49 PM2018-01-15T23:49:45+5:302018-01-15T23:50:46+5:30
रोहीत सांडेकर खून प्रकरणातील काही आरोपींची नुकतीच जामिनावर सुटका झाली.
आॅनलाईन लोकमत
तुमसर : रोहीत सांडेकर खून प्रकरणातील काही आरोपींची नुकतीच जामिनावर सुटका झाली. दरम्यान सांडेकर यांच्या कुटूंबीय तथा मित्रमंडळीने तुमसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आक्षेप नोंदविला. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तुमसर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. तुमसर पोलिसांनी सांडेकर कुटूंबीयांची समजूत काढून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले.
२१ आॅगस्ट २०१७ रोजी शहरातील शहर वॉर्डात रोहीत सांडेकर याची तिक्ष्ण शस्त्राने खनू केला होता. त्यावेळी सांडेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. खून प्रकरणातील आरोपीनां तुमसर पोलिसांनी काही तासातच अटक केली होती. या खून प्रकरणातील काही आरोपींना नुकतीच जामिन मिळाला आहे.
जामिनावर सांडेकर यांच्या कुटूंबीयांनी आक्षेप नोंदविला. रविवारी रात्री १० च्या सुमारास कुटूंबिय व मित्रांनी तुमसर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. तुमसर पोलिसांनी सांडेकर कुटूंबीय व मित्रमंडळीशी चर्चा करुन समजूत काढली.
सध्या प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर भाष्य करता येत नाही. त्यात पोलिसांची कोणतीच भूमिका नाही असे कुटूंबीयांना सांगितले. पोलीस ठाण्यात रात्री मोठी गर्दी झाल्याने काय झाले अशी चर्चा शहरात सुरु होती. त्यामुळे पोलीस कोणती कारवाई करतात याकडे तुमसरवासियांचे लक्ष लागलेले आहे.
तीन युवकांचा धुडगुस
रविवारी रात्री बाजार परिसरात तीनयुवकांनी धुडघूस घातला होता. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. बाजार परिसरातील धुडघूस प्रकरणात तक्रार नसल्याने कारवाई झाली नाही.
रोहीत सांडेकर खून प्रकरणातील आरोपी जामीनावर बाहेर आले. यात पोलिसांची भूमिका नाही. कुटूंबीय व मित्रमंडळीला तशी माहिती देण्यात आली. दुसºया प्रकरणात धुडगुस घालणाऱ्या विरोधात तक्रार आल्यास निश्चितपणे कारवाई करण्यात येईल.
-गजानन कंकाळे, पोलीस निरीक्षक तुमसर