निसर्गासह वीज कंपनीही कोपली

By admin | Published: July 9, 2015 12:37 AM2015-07-09T00:37:50+5:302015-07-09T00:37:50+5:30

निसर्गाने हुलकावणी दिली असतानाच वीज वितरण कंपनीनेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे.

The power company also with nature, Kopali | निसर्गासह वीज कंपनीही कोपली

निसर्गासह वीज कंपनीही कोपली

Next

दोन डीपी बंद : शेतशिवारात विजेचा तुटवडा, पीक करपू लागले, आर्थिक संकट
नितेश किरणापुरे लवारी
निसर्गाने हुलकावणी दिली असतानाच वीज वितरण कंपनीनेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे. दोन डीपी बंद अवस्थेत असल्याने पिकांना सिंचन करून वाचविण्यात शेतकरी असमर्थ ठरत आहे. यामुळे तो पुरता हतबल झाला आहे.
जांभुळघाट परिसरातील डी.पी. ही गेल्या दोन वर्षापासून बंद पडलेली आहे. काही ठिकाणाहून विद्युत तारे सुद्धा तुटलेली आहेत. या परिसरातील जवळपास २७ वीज जोडणी आहे. यातून सुमारे ६० एकरात ओलीत करण्यात येते. यासोबतच महिनाभरापासून गूळ फॅक्टरी परिसरातील डी.पी. वरील ट्रान्सफार्मर जळाले आहे. याची नोंद केली असता त्याची दुरूस्ती करण्याकडे वीज कंपनीने दुर्लक्ष केलेले आहे. यात २० कनेक्शन बसविले आहेत व ४० ते ४५ एकर शेतीला हे ओलीत करतात. या गोष्टी लक्षात घेता आता भात लागवडीच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हे टाकले आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. निसर्ग कोपला असून वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे सिंचन होऊ शकत नसल्याने पऱ्हे करपले आहेत.
शेतातील पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढवण्याचे चिन्ह दिसू लागली आहे. अशी परिस्थिती असतांनाही लवारी परिसरात स्थायी लाईनमेन नसल्याने नागरिक पहिलेच त्रस्त आहे. त्याामुळे लवारी परिसरातील विजेच्या समस्या सोडविण्यासाठी स्थायी लाईनमेन द्यावा व बंद असलेल्या डीपी त्वरीत सुरू करण्याची मागणी आहे.

डीपी बंद असल्याबाबत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शेंडे यांना विचारणा केली असता, त्यांनी एक डीपी सुरू असल्याचे सांगितले. मात्र, दुसऱ्या डीपीबाबत त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

गुळफॅक्टरी शिवारातील डी.पी. वरील ट्रान्सफार्मर महिनाभरापासून बंद पडलेले आहे. याची तक्रार केली आहे. महावितरण कंपनी या बाबीकडे कानाडोळा करीत असल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित झाले आहेत.
- जयगोपाल गभणे
शेतकरी, लवारी.

गेल्या दोन वर्षापासून जांभुळघाट शिवारातील डी.पी. बंद पडलेली आहे व ताराही तुटलेल्या आहेत. याची तक्रार केली आहे. तरी वितरण कंपनीने याकडे लक्ष दिले नाही. या परिसरातील शेत पिके धोक्यात आली आहे.
- अनिल किरणापुरे
उपसरपंच लवारी

Web Title: The power company also with nature, Kopali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.