लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या संकटात लढा देण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच पटेल यांनी आपल्या खासदार स्थानिक विकास निधीतून गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याला प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी दिला होता.देश आणि राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढ आहे. यामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिणामी सर्व उद्योग धंदे आणि बाजारपेठ पूर्णपणे ठप्प आहे. देशात संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. देश व राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाशी केंद्र व राज्य सरकार सक्षमपणे लढा देत आहे. डॉक्टर, पोलीस अधिकारी, कर्मचारी सुध्दा दिवसरात्र झटत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती विरुध्द शासन आणि प्रशासन सक्षमपणे सामना करीत आहे. कोरोनाविरुध्दची लढाई अधिक तीव्रपणे लढता यावी यासाठी खासादर प्रफुल्ल पटेल यांनी एक कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान मदत निधीत जमा करण्याची घोषणा केली आहे.तसेच यासंबंधीचे पत्र सुध्दा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. देश व राज्यात निर्माण झालेल्या स्थितीत सरकारच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याची गरज असून यासाठी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील अदानी विद्युत प्रकल्प, सनफ्लेग, अशोक लेलॅन्डसारख्या उद्योगजकांनी सुध्दा पुढे येऊन मदत करावी असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच राहून शासनाच्या दिशा निर्देशांचे पालन करावे असे सांगितले.
प्रफुल्ल पटेल यांची एक कोटींची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 5:00 AM
देश आणि राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढ आहे. यामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिणामी सर्व उद्योग धंदे आणि बाजारपेठ पूर्णपणे ठप्प आहे. देशात संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. देश व राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाशी केंद्र व राज्य सरकार सक्षमपणे लढा देत आहे. डॉक्टर, पोलीस अधिकारी, कर्मचारी सुध्दा दिवसरात्र झटत आहे.
ठळक मुद्देपंतप्रधान सहायता निधी : कोरोना विरुद्ध लढाईसाठी पुढाकार