१६ आधारभूत धान खरेदी केंद्राअंतर्गत १.६० लाख क्विंटल धानाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:24 AM2021-07-02T04:24:38+5:302021-07-02T04:24:38+5:30
गत रब्बी हंगामात तालुक्यात शासनाने १६ आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले होते. त्यामध्ये खरेदी-विक्री सहकारी संस्थेअंतर्गत ५, विजयलक्ष्मी ...
गत रब्बी हंगामात तालुक्यात शासनाने १६ आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले होते. त्यामध्ये खरेदी-विक्री सहकारी संस्थेअंतर्गत ५, विजयलक्ष्मी राईस मिल संस्थेचे ३, पंचशील भातगिरणीचे १, तर खासगी बेरोजगार संस्थांचे ७ अशा एकूण १६ आधारभूत धान खरेदी केंद्रांचा समावेश आहे.
मागील रब्बी हंगामात शासनाद्वारे तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या धान खरेदी केंद्रांत गोदामांची सुविधा, शेतकऱ्यांद्वारा सातबारा ऑनलाईन नोंदणी व बारदानांचा अभाव, आदी विविध असुविधांमुळे तालुक्यातील धान खरेदी केंद्राअंतर्गत धान खरेदीत घसरण आल्याचा आरोप केला जात आहे. तालुक्यात आत्तापर्यंत उन्हाळी धान खरेदीअंतर्गत केवळ तीन हजार २५७ शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी झाली आहे. ही खरेदी केवळ ३० टक्के असून अजूनही ७० टक्के धानाची खरेदी शिल्लक आहे.
उन्हाळी धानखरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या धानखरेदी केंद्रांना गत १५ दिवसांपूर्वीपासून बारदानांचा पुरवठा न करण्यात आल्याने धान खरेदी केंद्र बंद पडले होते. विविध समस्यांमुळे तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या १६ आधारभूत धान खरेदी केंद्रांपैकी पाच खरेदी केंद्रांत सर्वांत कमी धानाची खरेदी करण्यात आली आहे. सर्वांत कमी धान खरेदी करणाऱ्या केंद्रांमध्ये बारव्हा, कुडगाव, मासळ, दिघोरी (मोठी) व डोकेसरांडी, आदी केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांअंतर्गत केवळ २७० शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात आली; तर कुडेगाव केंद्राअंतर्गत केवळ २६ शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी झाली आहे. उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाद्वारे धानखरेदीच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांत केली जात आहे.
010721\img-20210629-wa0035.jpg
जि प शाळेत खरेदी केलेले धान