पालांदूर : प्रहार जनशक्ती पक्ष पालांदूर तसेच प्रहार सेवक जयंत देशपांडे भंडारा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांत गुणवंत ठरलेल्या परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्रावीण्य प्राप्त खेळाडू व ज्येष्ठ नागरिकांचा भारतीय संविधानाची प्रस्तावना भेट स्वरूप देऊन अनोख्या प्रकारे गौरव करण्यात आला.
यात प्रामुख्याने पालांदूर परिसरातील मचारणा येथील सानू भाऊराव घोनमोडे या गुणवंत विद्यार्थिनीचा व प्रावीण्य प्राप्त खेळाडूमध्ये चेतन रोकडे, धीरज बुरडे व संपूर्ण कबड्डी चमूची राज्यस्तरीय स्पर्धेत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांच्या कबड्डी चमूचा, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक म्हणून मौजा सानगाव येथील शिवगीर रामगीर गिरी यांना भारतीय संविधानाची प्रस्तावना भेटस्वरूप देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाकरिता प्रहार भंडारा चे माजी अध्यक्ष राजेश पाखमोडे, प्रहार सेवक जयेंद्र देशपांडे, शालिक बोरकर पाटील यांच्यासह पालांदूरचे प्रहार शाखाध्यक्ष जितेंद्र कुंभरे, सहसचिव बबलू पठाण, ओमप्रकाश कटणकर, प्रकाश बांते महाराज, माधव ठवकर, संतोष फरकोंडे, नीतेश खंडाईत, देवानंद लांजेवार, शैलेश दहेलकर, अविनाश नागलवाडे, अविनाश बावणे, सोपान झलके, अरिष पठाण यांनी सहकार्य केले.