पितृपंधरवड्यात भोपळा खातोय भाव; बीटीबी मंडईत ४०, तर घराजवळ ६० रुपये किलो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:38 AM2021-09-25T04:38:14+5:302021-09-25T04:38:14+5:30
बॉक्स व्यापारी काय म्हणतात... आम्हाला बीटीबीमध्ये जो दर मिळतो त्याच्यापेक्षा चार पैसे आम्ही अधिकचे लावतो. दिवसभर बसून आम्हालाही विक्री ...
बॉक्स
व्यापारी काय म्हणतात...
आम्हाला बीटीबीमध्ये जो दर मिळतो त्याच्यापेक्षा चार पैसे आम्ही अधिकचे लावतो. दिवसभर बसून आम्हालाही विक्री करावी लागते. कधी, कधी मालही खराब होतो. मग हा तोटा कुठून निघणार. फार नाही, पण आम्हालाही रोजी मिळाली पाहिजे. अशा पद्धतीने विक्री करतो.
हेमलता मारबते, भंडारा
कोट व्यापारी
मी गेल्या चार वर्षांपासून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत आहे. भाजीपाला विक्रीचा व्यवसाय म्हणजे कधी नफा तर कधी तोटा. त्यामुळे दररोजच्या भावात चढ-उतार होत असते.
शैलेश गायधने,
बॉक्स
मागणी वाढली ...
नुकताच गणेशोत्सव संपला आहे. सध्या धार्मिक कार्यक्रमही सुरु आहेत. सणांमुळे अनेकजण आपल्या गावी परतल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. गणपती, दुर्गा बसल्यानंतर अनेकांच्या घरी जेवणाचे कार्यक्रम केले जातात. आगामी नवरात्र उत्सवादेखील जवळ असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढू लागली आहे.
बॉक्स
अर्धा किलोसाठी बाजारात कोण जाणार...
कोट
आपण एकदाच भाजीपाला घेतला तर तो खराब होतो. भंडारा शहरात दररोज भरपूर भाजीवाले दारावर येतात. पैसे जादा लागतात, पण अर्ध्या किलोसाठी बाजारात कोण जाणार. पेट्रोलही खूप वाढले आहे.
संगीता बाभरे, गृहिणी भंडारा
कोट
आमच्या घरी केवळ दोनच माणसे. त्यामुळे फारसा भाजीपाला लागत नाही. पण जरी भाजीपाला घ्यायचा झाला तरी मात्र मी दारावरच घेते. चार पैसे जास्त जातात, पण ताजा भाजीपाला मिळून जातो.
अनिता कावळे, गृहिणी भंडारा
भाजीपाल्यांचे दर खालीलप्रमाणे
भोपळा ३०, ४०
गवार ६०, ८०
कारली ३०,४०
वांगी ४०,६०
वाटाणा ७०,१००
टमाटा ३०, ४०
बटाटा २०,३०
फ्लावर ३०, ५०
सिमला ७०,८०
बिट ४०,५०
भेंडी २५,४०